... इथं गुडघेदुखी होते गायब! महाराष्ट्रातलं प्रसिद्ध गुडघेमोडी माता मंदिर, लोकेशन माहितीये का?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
Pune News: महाराष्ट्राच्या विविध भागांमधून तसेच इतर राज्यांतूनही अनेक भक्त येथे येऊन दर्शन घेतात. इथं आल्यावर गुडघेदुखीतून आराम मिळतो अशी भाविकांची धारणा आहे.
advertisement
1/7

ऐतिहासिक आणि धार्मिक वारशानं समृद्ध शहर अशी पुणे शहराची ओळख आहे. भाविकांची श्रद्धास्थाने असणारी विविध मंदिरे पुण्याच्या अनेक भागात आहेत. त्यातीलच एक अनोखं मंदिर म्हणून गुडघेमोडी माता मंदिराची ओळख आहे.
advertisement
2/7
पुण्यातील शुक्रवार पेठ परिसरात वसलेले हे मंदिर गुडघ्यांच्या वेदनांपासून आराम मिळतो, या श्रद्धेमुळे विशेष प्रसिद्ध आहे. स्थानिक नागरिक तसेच राज्यातून आणि परराज्यातून देखील अनेक भाविक देवीच्या दर्शनासाठी आणि गुडघेदुखीतून आराम मिळवण्याच्या उद्देशानं या ठिकाणी येत असतात.
advertisement
3/7
स्थानिक लोकांच्या मान्यतेनुसार मंदिराचा इतिहास जवळपास साडेतीनशे वर्षांपूर्वीचा आहे. तर पेशवाईच्या काळात मंदिर नव्यानं बांधल्याचं सांगितलं जातं. काळाच्या ओघात मंदिराने केवळ धार्मिकच नव्हे तर सांस्कृतिक दृष्ट्याही एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.
advertisement
4/7
मंदिराबाबत अनेक आख्यायिका प्रचलित आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांनी येथे भेट दिली होती आणि देवीचे दर्शन घेतले होते. त्या वेळी त्यांना झालेल्या त्रासातून आराम मिळाला, अशी एक आख्यायिका देखील सांगितली जाते. या गोष्टी ऐतिहासिकदृष्ट्या सिद्ध नसल्या तरी मंदिराच्या परंपरेचा भाग म्हणून या कथा सांगितल्या जातात.
advertisement
5/7
गुडघेमोडी माता मंदिरातील देवीची मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण असून तांदळाच्या रुपात असल्याचे सांगितले जाते. दररोज सकाळ-संध्याकाळ देवीची नियमित पूजा आणि आरती केली जाते. तसेच नवरात्र, चैत्रोत्सव यांसारख्या सणांच्या काळात या ठिकाणी विशेष धार्मिक विधी आणि कार्यक्रम आयोजित केले जातात.
advertisement
6/7
महाराष्ट्राच्या विविध भागांमधून तसेच इतर राज्यांतूनही अनेक भक्त येथे येऊन दर्शन घेतात. गुडघ्यांच्या वेदनांपासून आराम मिळावा या भावनेने अनेक जण देवीसमोर नवस बोलतात. काही भक्तांना श्रद्धेने अनुभवही आल्याचे ते सांगतात. अनेक वर्षांपासून लोक येथे श्रद्धेने येत असून मंदिराची परंपरा आजही कायम ठेवली जात आहे, असे स्थानिक विशाल जुन्नरकर यांनी सांगितले.
advertisement
7/7
(सूचना: येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/Temples/
... इथं गुडघेदुखी होते गायब! महाराष्ट्रातलं प्रसिद्ध गुडघेमोडी माता मंदिर, लोकेशन माहितीये का?