आलिशान इमारतीत 3 बीएचके फ्लॅट
भोंदूबाबा अशोक खरातच्या मुलीच्या नावावर पुण्यातील मॉडेल कॉलनीत आलिशान इमारतीत 3 बीएचके फ्लॅट असल्याची माहिती समोर आली आहे. 24 रत्नम नावाच्या आलिशान सोसायटीत सातव्या मजल्यावर 1055 चौरस फुटांचा आलिशान फ्लॅट खरातच्या मुलीच्या नावावर आहे. खरातच्या मुलीने 13 सप्टेंबर 2023 रोजी हा फ्लॅट खरेदी केला होता.
advertisement
बिल्डरला 1 कोटी 20 लाख रूपये रोख
फ्लॅट खरेदी करताना खरातने संबंधित बिल्डरला 1 कोटी 20 लाख रूपये रोख स्वरूपात दिले होते, अशी माहिती समोर आली आहे. तसेच यामध्ये सेल डीडमध्ये चेकने व्यवहार केल्याचा कुठलाही उल्लेख नाही. राज्यभरातील प्रमुख शहरांमध्ये खरातची स्थावर मालमत्ता असल्याचं समोर आलं आहे.
खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
अशोक खरात याला पहिल्या गुन्ह्यात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. न्यायालयीन कोठडी मिळताच दुसऱ्या गुन्ह्यात ताबा मिळण्यासाठी तपास अधिकाऱ्यांचा न्यायालयात अर्ज केला होता. तपास अधिकाऱ्यांचा न्यायालयाकडून अर्ज मंजूर करण्यात आला आहे. अशोक खरात याला दुसऱ्या गुन्ह्यात ताब्यात घेण्याची न्यायालयाची परवानगी दिली आहे. उद्या पुन्हा पोलिस कोठडी मिळवण्यासाठी अशोक खरात याला न्यायालयात हजर करणार आहे.
सीए प्रकाश पोफळेची संपत्ती
दरम्यान, खरातचा सीए प्रकाश पोफळे याने 2024 मध्ये कोरेगाव पार्क परिसरात तब्बल 8 रो-हाऊसेस आणि 49 गुंठे जागा खरेदी केल्याचे पुरावे एसआयटीच्या (SIT) हाती लागले आहेत. कागदोपत्री या व्यवहाराची किंमत 19 कोटी 56 लाख रुपये दाखवण्यात आली असली, तरी बाजारभावानुसार या मालमत्तेची किंमत 100 कोटी रुपयांहून अधिक असल्याचे बोलले जात आहे.
