श्रावणात पूजेच्या साहित्याची करायचीय खरेदी? 'इथं' मिळतील सर्व वस्तू
- Published by:News18 Lokmat
- local18
Last Updated:
पूजेचं सर्व साहित्य मिळणारं एक ठिकाण डोंबिवलीत असून तिथं या वस्तूंवर तब्बल 60 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे.
advertisement
1/5

श्रावण महिन्याला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावण हा व्रत वैकल्याचा महिना आहे. या महिन्यात वेगवेगळे सण आहेत. त्या निमित्तानं घरात पूजा तसंच यज्ञ केली जातात. या पूजेसाठी लागणारं साहित्य जमवण्यासाठी अनेकदा धावपळ करावी लागते.
advertisement
2/5
पण डोंबिवलीकरांना ही धावपळ कमी होणार आहे. कारण, पूजेचं सर्व साहित्य मिळणारं एक ठिकाण डोंबिवलीत असून तिथं या वस्तूंवर तब्बल 60 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे.
advertisement
3/5
डोंबिवली पूर्वेच्या फडके रोडवर पूजाधाम या मंदिरात हे साहित्य मिळते. या दुकानात ब्राँझमधल्या वेगवेगळ्या देवांच्या मूर्ती मिळतात. देवाचे कपडे, कापसाच्या वाती, तांब्याची भांडी, कंठी, जपमाळ, समई, दिवे अशा पूजेसाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू येथे उपलब्ध आहेत.
advertisement
4/5
या दुकानात सत्य नारायण पूजेसाठी लागणारे एक खास किट मिळते. त्यामध्ये सत्यनारायणाचा एक फोटो, पूजेची पोथी, हळद, कुंकू, चंदन या सर्व गोष्टी या किटमध्ये मिळतात. त्यामुळे सत्यनारायणाच्या पूजेला कोणतीही अडचण येत नाही.
advertisement
5/5
कुंडीच्या आकाराची धुपकांडी म्हणजेच धुपकप येथे उपलब्ध आहे. हा धुपकप दोन दिवस जळतो आणि त्याला चंदनाचा वास येतो. दरम्यान छोट्या आकारातील धुपकप देखील उपलब्ध आहे ती पेटवल्यानंतर तीही जवळपास दोन ते तीन तास जळते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
श्रावणात पूजेच्या साहित्याची करायचीय खरेदी? 'इथं' मिळतील सर्व वस्तू