मनोरंजन विश्वात खळबळ! 'धुरंधर' फेम अभिनेत्याला अटक, 10 वर्षांनी समोर आलं धक्कादायक कांड
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Dhurandhar fame Actor Arrested : धुरंधर सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. अभिनेत्याच्या बाबत एक धक्कादायक कांड तब्बल 10 वर्षांनी समोर आलं आहे.
advertisement
1/8

मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. 2025 वर्षाच्या शेवटी धुरंधर या सिनेमाची खूप चर्चा सुरू होती. आताही धुरंधरची क्रेझ कमी झालेली नाही. अशातच धुरंधर सिनेमातील एका अभिनेत्याला पोलिसांनी अटक केली आहे. अभिनेता पोलिसांच्या ताब्यात असून पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत.
advertisement
2/8
धुरंधर सिनेमा रहमान डकैतचा कुक अखलाकची भूमिका साकारणारा अभिनेता नदीम खान याला पोलिसांनी अटक केली आहे. मालवणी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. नदीम खानवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली ही अटक करण्यात आली आहे.
advertisement
3/8
अभिनेता नदीप खानने त्याच्या घरात काम करणाऱ्या महिलेवर मागील 10 वर्षांपासून बलात्कार आणि लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप त्याच्यावर करण्यात आला. नेमकं प्रकरण काय आहे पाहूयात.
advertisement
4/8
पीडित महिला ही नदीम खानच्या घरी घरकामाला होती. नदीमने तिला लग्न करण्याचं खोटं आश्वान देऊन अनेक वर्ष तिच्यावर शरीर संबंध ठेवले असा आरोप तिनं केला आहे.
advertisement
5/8
त्याचप्रमाणे 2015 पासून नदीम खानने घरी काम करणाऱ्या महिलेचा विश्वास संपादन केला आणि लग्नाचं खोटं आश्वासन देऊन तिच्यावर वारंवार अत्याचार आणि बलात्कार केल्याचं पीडित महिलेनं तिच्या तक्रारीमध्ये म्हटलं आहे.
advertisement
6/8
पीडित महिलेला सुरुवातीला तक्रार दाखल करण्यास भीती वाटत होती. मात्र अभिनेत्याने लग्न करण्यास स्पष्ट नकार दिल्यानंतर तसंच मानसिक छळ वाढू लागल्यानंतर तिने पोलिसांकडे धाव घेतली.
advertisement
7/8
पीडित महिलेच्या तक्रारीनंतर मालवणी पोलिसांनी अभिनेता नदीम खानवर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. नदीम अशाप्रकारे आणखी किती महिलांची फसवणूक केली आहे याचा पोलीस तपास करत आहेत.
advertisement
8/8
अभिनेता नदीम खानच्या वर्कफ्रंटविषयी सांगायचं झाल्यास तो, गेली अनेक वर्ष सिनेमांमध्ये लहानमोठ्या भूमिका करताना दिसला आहे. क्राइम थ्रीलर असलेल्या वध सिनेमातही त्याने काम केलं आहे. तो थिएटर आर्टिस्ट असल्याचं तो सांगतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
मनोरंजन विश्वात खळबळ! 'धुरंधर' फेम अभिनेत्याला अटक, 10 वर्षांनी समोर आलं धक्कादायक कांड