TRENDING:

'आमचा शो घाणेरडा नाही, आम्ही पण लावणी...' BBM 6 मधून बाहेर पडल्यावर राधा पाटिलचं स्टेटमेन्ट चर्चेत

Last Updated:
Radha Patil Statement on Lavani : राधा पाटिल बिग बॉस मराठी 6 मधून आऊट झाली. घरातून आऊट झाल्यानंतर तिने तिचे शो आणि लावणी याबद्दल केलेलं स्टेटमेन्ट चर्चेत आलं आहे.
advertisement
1/7
'आमचा शो घाणेरडा नाही, आम्ही पण लावणी...'  राधा पाटिलचं स्टेटमेन्ट चर्चेत
पहिल्या आठवड्यात घरातून कोणाची एक्झिट झाली नाही, त्यामुळे बिग बॉस मराठीच्या घरातून कोणाची एक्झिट होणार हा प्रश्न सगळ्यांसमोर होता. बिग बॉस मराठीच्या घरातून EXIT घेणारी पहिली सदस्य राधा पाटील ठरली आहे.
advertisement
2/7
राधा पाटिलच्या एक्झिटनंतर घरातील समीकरणं कशी बदलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पुढच्या भाऊच्या धक्क्यानंतर कोणाची शाळा तर कोणाला शाबासकी मिळणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
advertisement
3/7
बिग बॉस मराठी 6 मधून दुसऱ्या आठवड्यातील घराबाहेर पडलेली सदस्य राधा पाटिल आऊट झाल्यानंतर म्हणाली, "माझ्यासाठी ही खूप मोठी संधी होती. मला खेळता नाही आलं. पण मी वरती जाण्यासाठी नक्की प्रयत्न करेन. कारण वेगवेगळ्या माणसांबरोबर मी राहू शकेन की नाही यासाठी मी मॅच्युर नाहीये. पहिल्यांदाच मी असं इथे कुठेतरी आले आहे."
advertisement
4/7
"मला महाराष्ट्राला हे दाखवायचं होतं की आमचा जो शो आहे तो घाणेरडा नाहीये. आम्हीपण लावणी व्यवस्थित करू शकतो. याच्यापुढेही आम्ही करू."
advertisement
5/7
रितेश म्हणाला, "आपण सगळे कलाकार आहोत. आपलं काम आहे लोकांचं मनोरंजन करणं. हा बिग बॉसचा शो असो किंवा आपली कला असो तुम्ही असंचं लोकांचं मनोरंजन करत राहा. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा देतो."
advertisement
6/7
घरातून बाहेर आल्यानंतर राधाला तिचा दोन आठवड्यांचा प्रवास दाखवण्यात आला, तो प्रवास पाहून राधा म्हणाली, "मला दु:ख वाटत नाहीये. मला इथे खूप काही शिकायला मिळालं. पुढे मला जर असा चान्स मिळाला तर मी नक्की येईन आणि चांगलं खेळून दाखवेन."
advertisement
7/7
"हे सगळं माझ्यासाठी खूप नवीन होतं. हे घर सोपं नाहीये. आतमध्ये जे लोक आहेत त्यांनाच माहिती आहे की इथे राहणं किती अवघड आहे. किती अवघड आहे सगळ्यांशी बोलणं. मला भीती वाटत होती पण मला जमलं तसं मी खेळले. मी महाराष्ट्राला नक्की दाखवून देईन की मी खूप चांगली डान्सर आहे."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'आमचा शो घाणेरडा नाही, आम्ही पण लावणी...' BBM 6 मधून बाहेर पडल्यावर राधा पाटिलचं स्टेटमेन्ट चर्चेत
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल