Healthy Heart साठी कोणतं तेल सर्वोत्तम? माधुरीच्या डॉक्टर नवऱ्यानं सांगितलं
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
अभिनेत्री माधुरी दीक्षितचे पती श्रीराम नेने हे स्वतः डॉक्टर असून ते नेहमी आपल्या सोशल मीडियावर आरोग्यासंबंधित विविध गोष्टी सांगत असतात. हृदयरोगाने अनेक लोक सध्या त्रस्त आहेत. तेव्हा डॉ. नेने यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला असून यात हृदयाच्या आरोग्यासाठी कोणतं तेल चांगलं आहे याबाबत माहिती दिली आहे.
advertisement
1/5

राइस ब्रान ऑयल : चांगल्या आरोग्यासाठी राइस ब्रान ऑयलचे सेवन केले जाऊ शकते. राइस ब्रान ऑयल अँटी ऑक्सीडेंटप्रमाणे काम करते आणि इंफ्लेमेशन दूर करते ज्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते. याशिवाय ब्लड शुगर लेव्हल कमी करण्यासाठी तेल फायदेशीर ठरू शकते. वाईट कोलेस्ट्रॉलला कमी करण्यासाठी राइस ब्रान ऑयल उपयोगी ठरू शकते.
advertisement
2/5
शेंगदाणे तेल : हृदयाच्या आरोग्यासाठी शेंगदाणे तेल फायदेशीर ठरते. या तेलात व्हिटॅमिन ई, माॅनोअनसॅचुरेटेड फॅटी ऍसिड आणि पॉलीअनसॅचुरेटेड फॅटी ऍसिड असतात जे हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी फायदेशीर ठरते. या तेलामुळे बॅड कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका कमी असतो तसेच चांगले कोलेस्ट्रॉल वाढते.
advertisement
3/5
मोहरीचे तेल : अनेक घरांमध्ये जेवण बनवण्यासाठी मोहरीच्या तेलाचा वापर केला जातो. मोहरीच्या तेलात सॅच्युरेटेड फॅटी ऍसिडची मात्र कमी असते परंतु फायदेशीर ठरणाऱ्या माॅनोअनसॅचुरेटेड फॅटी ऍसिड आणि पॉलीअनसॅचुरेटेड ऍसिडची मात्रा जास्त असते. हे तेल हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले ठरते. तसेच यात अँटी-बॅक्टीरियल, अँटी फंगल आणि अँटी बायोटिक इत्यादी गुण असतात.
advertisement
4/5
ऑलिव ऑइल : अँटी इंफ्लेमेटरी गुणांनी भरपूर असलेल्या ऑलिव ऑयलमुळे शरीराला अनेक फायदे मिळतात. या तेलात अँटी ऑक्सीडेंट्सचे सुद्धा चांगलं प्रमाण असतं. हे तेल ब्लड कोलेस्ट्रॉलला आणि ऑक्सीडाइज होण्यापासून रोखते. यामुळे हृदयाच्या आरोग्याचा धोका कमी होतो.
advertisement
5/5
तिळाचं तेल : तिळाच्या तेलात अँटी ऑक्सिडंट असतात जे शरीराला नुकसान पोहोचवणाऱ्या फ्री रेडिकल्स पासून बचाव करतात. यात ओमेगा-3 फॅटी ऍसिड आणि अँटी इंफ्लेमेटरी गुण आढळतात. तिळाचं तेल झिंक, आयरन आणि व्हिटॅमिन ई तसेच मॅग्नेशियमचा चांगला स्रोत असतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Healthy Heart साठी कोणतं तेल सर्वोत्तम? माधुरीच्या डॉक्टर नवऱ्यानं सांगितलं