Side Effects Of Eating Salt : हार्टअटॅकसाठी कारणीभूत ठरू शकतो रोजच्या आहारातील 'हा' घटक, किती असावं प्रमाण?
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
सध्या धावपळीचं जीवन, पोषक आहाराची कमतरता, ताणतणाव इत्यादींमुळे वृद्धांसह, तरुणांना देखील हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण वाढलं आहे. हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीर रुग्णाला विविध प्रकारचे संकेत देत असत. परंतु याकडे दुर्लक्ष केल्याने हार्ट अटॅकचा तीव्र झटका येतो. मीठ हा असा घटक आहे जो पदार्थाची चव वाढवण्यास महत्वाचा ठरतो. परंतु जर त्याचे सेवन प्रमाणाच्या बाहेर केले तर आरोग्यासाठी ते हानिकारक ठरते आणि अनेक आरोग्याच्या समस्या बळावतात.
advertisement
1/5

ब्लडप्रेशर : आहारात मीठाचं जास्त सेवन केल्याने हाय बीपीची समस्या निर्माण होते. तेव्हा जेवणात जास्त मीठ वापरणं टाळा.
advertisement
2/5
हृदयविकार : आहारात जास्त मिठाचे सेवन केल्यास हृदयरोग किंवा स्ट्रोक येण्याचा धोका वाढतो. तेव्हा हार्टला निरोगी ठेवण्यासाठी मिठाचे कमी प्रमाणात सेवन करावे. तेव्हा प्रतिदिन पाच ग्रॅम पेक्षा अधिक मिठाचे सेवन करू नये.
advertisement
3/5
डिहायड्रेशन : आहारात जास्त मीठ खाल्ल्याने डिहायड्रेशनची समस्या जाणवते. त्यामुळे तुम्हाला विविध आजार बळावू शकतात. अशावेळी तुम्ही आहारात मिठाचे प्रमाण मर्यादित ठेवावे आणि पाणी पिण्याचे प्रमाण वाढवावे.
advertisement
4/5
सूज येणे : जर तुम्ही दररोजच्या आहारात मिठाचे जास्त सेवन केले तर शरीरात गरजेपेक्षा जास्त पाणी जमा होते. याला फ्लूड रिटेंशन असं म्हणतात. असे झाल्यास हातापायांना सूज येऊ लागते.
advertisement
5/5
किडनीची समस्या : जर तुम्ही दररोज आहारात अतिरिक्त मिठाचे सेवन करत असाल तर तुम्हाला किडनी फेल्युअरची समस्या जाणवू शकते. मिठाचे जास्त सेवन मूत्र मध्ये कॅल्शियमचे स्तर वाढवते. ज्यामुळे किडनी स्टोन होण्याची समस्या देखील निर्माण होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Side Effects Of Eating Salt : हार्टअटॅकसाठी कारणीभूत ठरू शकतो रोजच्या आहारातील 'हा' घटक, किती असावं प्रमाण?