Tips and Tricks : जिद्दी डाग काढण्यासाठीही वापरता येते प्रेस! इस्त्रीचा असा वापर तुम्ही पाहिला नसेल..
- Published by:Pooja Jagtap
- local18
Last Updated:
Smart Iron Hacks : इस्त्रीचा वापर कपडे प्रेस करण्यासाठी केला जातो. पण भारतीयांना कोणत्याही वस्तूचा पुरेपूर फायदा कसा घ्यायचा हे माहित असतं. इस्त्रीच्या बाबतीतही तसंच आहे. वेगवेगळ्या वस्तूंवरचे जिद्दी डाग काढण्यासाठी इस्त्री कशी वापरायची याबद्दल इथे माहिती दिली गेलीय.
advertisement
1/7

तुम्हाला वाटत असेल इस्त्री डाग काढू कसे काय शकते. ती तर उलट कपड्यांवरचे डाग आणखी घट्ट करते. पण इस्त्रीचा वापर करून तुम्ही घरातल्या काही वस्तूंवरचे सहज ना निघणारे डाग किंवा घाण काढू शकता.
advertisement
2/7
काहीवेळा आपण घरी कँडल लाईट डिनरचा सेटअप करतो. ते क्षण तर सुंदर वाटतात. मात्र त्यानंतर टेबलक्लॉथ किंवा कार्पेटवर मेणबत्तीच्या डाग पडतात. लंकाहीवेळा ते सहज निघतात. पण काहीवेळा ते कापडाच्या आतपर्यंत जाऊन बसतात. अशावेळी ते काढणं अवघड होत. यासाठी तुम्ही इस्त्री वापरू शकता. यासाठी मेण पूर्ण सुकल्यावर ते चमच्याने खरवडून काढा. नंतर त्या भागावर कागद किंवा एखादे कापड ठेवा. इस्त्री कमी पॉवरवर सुरु करा आणि त्यावर लावा. या उष्णतेमुळे मेण वितळेल आणि कागदाला चिकटून बाहेर येईल.
advertisement
3/7
घरात लहान मुलं असल्यास सगळीकडे क्रेयॉन्सचे डाग असतातच. सोफ्यावर, भिंतीवर किंवा कार्पेटवर. हे साफ करण्यासाठी डाग असलेल्या भागावर पेपर टॉवेल किंवा कागदी पिशवी ठेवा. त्यावर कमी पॉवरवर सेट करून इस्त्री वापरा. क्रेयॉनदेखील मेणाप्रमाणे वितळून सहज कागदावर येईल. या युक्तीने डाग फिकट होत होत पूर्णपणे निघेल.
advertisement
4/7
बऱ्याचदा फर्निचर किंवा सजावटीच्या वस्तूंवर स्टिकर्स असतात. ते काढल्यानंतर एक चिकट पदार्थ वस्तूंनाच चिकटून राहातो. इस्त्री वापरून तुम्ही हे स्वच्छ काढू शकता. यासाठी चिकट भागावर पार्चमेंट पेपर ठेवा आणि कमी पॉवरवर इस्त्री सुरु करून ती त्या पेपरवर ठेवा. इस्त्रीच्या उष्णतेने चिकट भाग पूर्णपणे पेपरवर येईल. थोडा राहिल्यास हा तुम्ही सौम्य क्लिनरने स्वच्छ करू शकता. या युक्तीने फर्निचरला नुकसान अजिबात नुकसान होत नाही.
advertisement
5/7
बऱ्याचदा आपले जड फर्निचर कार्पेटवर असते आणि ते हलवल्यानंतर त्याचे ठसे पडतात. यामुळे कार्पेटमध्ये खड्डे दिसतात. हे नीट करण्यासाठी त्या भागावर एक ओलसर कापड ठेऊन स्टीम इस्त्रीचा वापर करा. उष्णता आणि आर्द्रतेमुळे कार्पेटचे धागे मऊ होतात. नंतर आपल्या बोटांनी किंवा चमच्याने त्यांना हळुवारपणे फुगवा. काही वेळातच कार्पेट पुन्हा नव्यासारखे दिसेल.
advertisement
6/7
इस्त्रीचा हा वापर भन्नाट आहे. कुशन कव्हर किंवा एखादे कापड उसवले असेल तर तुम्ही ते इस्त्रीच्या साहाय्याने चिकटवू शकता. यासाठी फ्युसिबल बॉण्डिंग टेप किंवा इस्त्रीने चिकटवण्याचा पॅच घ्या. हा पॅच जे भाग जोडायचे आहेत तिथे दाबून चिकटवा. यावर इस्त्री फिरवा आणि काही मिनिटांतच कापड व्यवस्थित जोडले जाईल.
advertisement
7/7
टेबलवर कोस्टरशिवाय ग्लास ठेवल्याने पांढरे गोलाकार डाग पडू शकतात. हे काढण्यासाठी फ्लॅट आयर्नचा वापर करा. डागावर एक पातळ सुती कापड ठेऊन कमी पावरवर इस्त्री वापरा. यामुळे डागातील ओलाव्याची हळूहळू वाफ होईल आणि डाग फिका पडेल. (Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Tips and Tricks : जिद्दी डाग काढण्यासाठीही वापरता येते प्रेस! इस्त्रीचा असा वापर तुम्ही पाहिला नसेल..