General Knowledge : केळ्याच्या सालीवरच पाय का घसरतो? इतर फळांवर असं का होत नाही? 99 टक्के लोकांना हे माहितच नाही
- Published by:Devika Shinde
Last Updated:
सफरचंद किंवा संत्र्याच्या सालीवरून आपण इतक्या वेगाने का पडत नाही? या साध्या वाटणाऱ्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी शास्त्रज्ञांनी चक्क प्रयोगशाळा गाठली आणि त्यांना जे आढळलं, त्यासाठी त्यांना Ig Nobel Prize पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. चला, समजून घेऊया यामागचं रंजक विज्ञान.
advertisement
1/8

रस्त्यावरून चालताना अचानक पाय केळ्याच्या सालीवर पडला आणि 'धपकन' खाली पडलो... हे दृश्य आपण अनेकदा चित्रपटात पाहिलं असेल किंवा आपल्यापैकी अनेकांनी प्रत्यक्ष अनुभवलंही असेल. त्यावेळी आजूबाजूचे लोक हसतात खरं, पण पडणाऱ्या व्यक्तीला होणाऱ्या वेदना आणि त्या क्षणी झालेली फजिती काही वेगळीच असते. पण तुम्ही कधी विचार केलाय का, की रस्ते तर खडबडीत असतात, चपलांना ग्रिप असते, तरीही केळ्याच्या सालीवर पाय पडताच आपण बर्फावरून घसरावे तसे का घसरतो?
advertisement
2/8
सफरचंद किंवा संत्र्याच्या सालीवरून आपण इतक्या वेगाने का पडत नाही? या साध्या वाटणाऱ्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी शास्त्रज्ञांनी चक्क प्रयोगशाळा गाठली आणि त्यांना जे आढळलं, त्यासाठी त्यांना Ig Nobel Prize पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. चला, समजून घेऊया यामागचं रंजक विज्ञान.
advertisement
3/8
केळ्याच्या सालीत दडलंय एक 'गुप्त' जेलकेळ्याची साल वरून जरी साधी वाटत असली, तरी तिच्या आतल्या बाजूला निसर्गाची एक किमया दडलेली असते. जपानमधील शास्त्रज्ञांच्या संशोधनानुसार, केळ्याच्या सालीच्या पृष्ठभागावर 'पॉलीसॅकराईड' (Polysaccharide) नावाच्या जेलने भरलेल्या अतिशय सूक्ष्म पिशव्या असतात.
advertisement
4/8
जेव्हा तुमचा पाय या सालीवर पडतो, तेव्हा शरीराच्या वजनामुळे या सूक्ष्म पिशव्या फुटतात. त्यातून बाहेर पडणारे हे जेल पाणी, साखर आणि प्रथिनांचे एक अतिशय गुळगुळीत मिश्रण असते. हे मिश्रण चप्पल आणि जमीन यांच्यामध्ये 'लुब्रिकंट' सारखे काम करते, ज्यामुळे आपली पकड एका सेकंदात गायब होते.
advertisement
5/8
घर्षण शून्याच्या जवळचालताना आपल्याला जमिनीवर स्थिर ठेवण्यासाठी 'घर्षण' मदत करते. पण केळ्याची साल हे घर्षण इतकं कमी करते की तुम्ही स्वतःला सावरूच शकत नाही.शास्त्रज्ञांना आढळलं की केळ्याच्या सालीचा घर्षण गुणांक (Friction Coefficient) फक्त 0.07 इतका असतो.तुलनेत सांगायचं तर, सफरचंदाच्या सालीचा हा गुणांक 0.1 असतो. केळ्याच्या सालीवरील हे जेल चिखलापेक्षाही जास्त निसरडे असते, म्हणूनच त्यावर पाय पडताच आपण वेगाने पुढे फेकले जातो.
advertisement
6/8
गुरुत्वाकर्षण केंद्राचा तोल जातोआपल्या शरीराचा समतोल तेव्हाच राहतो जेव्हा आपल्या शरीराचे गुरुत्वाकर्षण केंद्र (Center of Gravity) आपल्या पायांच्या क्षेत्राच्या आत असते. केळ्याच्या सालीवर पाय पडताच, त्या चिकट जेलमुळे पाय अनपेक्षितपणे खूप वेगाने पुढे सरकतो. यामुळे शरीराचे गुरुत्वाकर्षण केंद्र पायांच्या कक्षेबाहेर जाते. आपला मेंदू इतक्या वेगाने परिस्थिती सावरू शकत नाही आणि 'अॅक्शन-रिॲक्शन'च्या या खेळात आपण जमिनीवर आडवे होतो.
advertisement
7/8
इतर फळांपेक्षा केळ वेगळे का?सफरचंद, संत्री किंवा इतर फळांच्या सालीमध्ये ओलावा असतो, पण केळ्यासारखे 'पॉलीसॅकराईड जेल' नसते. हे जेल फक्त केळ्याच्या सालीचे वैशिष्ट्य आहे, जे तिला जगातील सर्वात 'निसरडी साल' बनवते.
advertisement
8/8
म्हणूनच, केळी खाल्ल्यानंतर साल रस्त्यावर फेकणे हा केवळ सार्वजनिक स्वच्छतेचा प्रश्न नाही, तर तो इतरांच्या सुरक्षिततेशी संबंधित आहे. तुमची एक छोटीशी चूक कोणाचे तरी हाड मोडण्यास कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे साल नेहमी कचराकुंडीतच टाका.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
General Knowledge : केळ्याच्या सालीवरच पाय का घसरतो? इतर फळांवर असं का होत नाही? 99 टक्के लोकांना हे माहितच नाही