TRENDING:

Watermelon : कलिंगड कापण्याची जपानी पद्धत माहितीय का? विना झंझट निघतील आतील बिया

Last Updated:
अनेकदा आपण कलिंगड कसंही कापतो, ज्यामुळे बिया पूर्ण घरभर पसरतात. पण तुम्हाला माहीत आहे का? कलिंगड कापण्याचंही एक खास 'गणित' आहे. सध्या सोशल मीडियावर 'जपानी कटिंग हॅक' (Japanese Watermelon Hack) जोरदार व्हायरल होत आहे.
advertisement
1/8
Watermelon : कलिंगड कापण्याची जपानी पद्धत माहितीय का? विना झंझट निघतील आतील बिया
कडक उन्हाळा सुरू झाला की, रस्त्यारस्त्यावर दिसणारे लालचुटूक आणि रसाळ कलिंगड खाण्याची इच्छा होते. उन्हात शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी आणि थंडावा मिळवण्यासाठी कलिंगड हे सर्वोत्तम फळ मानलं जातं. पण, कलिंगड खाण्यातला सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे त्यातील 'काळ्या बिया'. प्रत्येक घासाला तोंडात बिया येतात, ज्या काढताना अनेकदा कलिंगड खाण्याची इच्छाच निघून जाते. तर लहान मुलं तर बियांच्या धास्तीने कलिंगड खाणंच टाळतात.
advertisement
2/8
अनेकदा आपण कलिंगड कसंही कापतो, ज्यामुळे बिया पूर्ण घरभर पसरतात. पण तुम्हाला माहीत आहे का? कलिंगड कापण्याचंही एक खास 'गणित' आहे. सध्या सोशल मीडियावर 'जपानी कटिंग हॅक' (Japanese Watermelon Hack) जोरदार व्हायरल होत आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही एका मिनिटात बिया विरहित कलिंगड तयार करू शकता. चला तर मग, ही भन्नाट ट्रिक स्टेप-बाय-स्टेप समजून घेऊया.
advertisement
3/8
1. पाया भक्कम कराकलिंगड कापताना ते चॉपिंग बोर्डवर इकडे-तिकडे लुढकू नये, यासाठी सर्वात आधी टरबूजच्या वरचा आणि खालचा (दोन्ही टोकांचा) थोडा भाग कापून घ्या. यामुळे टरबूजला एक सपाट आधार मिळतो आणि ते स्थिर राहतं. आता एका मोठ्या आणि धारदार चाकूने टरबूजचे मधून बरोबर दोन समान भाग करा.
advertisement
4/8
2. निसर्गाचं 'ते' गुपित ओळखा जेव्हा तुम्ही कलिंगड मधून कापून त्याचे दोन भाग कराल, तेव्हा त्यातील लाल गराकडे नीट लक्ष देऊन पाहा. तुम्हाला गरामध्ये नैसर्गिकरित्या बनलेल्या काही रेषा दिसतील, ज्या साधारणपणे इंग्रजीतील '3' आकड्यासारखा किंवा त्रिकोणी पॅटर्न तयार करतात. विज्ञानानुसार, टरबूजच्या बहुतेक बिया याच रेषांच्या आजूबाजूला एका ओळीत लपलेल्या असतात. या रेषा ओळखणे हीच बिया काढण्याची पहिली पायरी आहे.
advertisement
5/8
3. 'त्रिकोणी' कट आणि मॅजिकहा पॅटर्न समजल्यानंतर, ज्या तीन मुख्य रेषा तुम्हाला दिसत आहेत, त्यांच्या मधोमध त्रिकोणी आकारात (Triangle Shape) कट लावा. तुम्ही या खुणांनुसार कापायला सुरुवात केली की, टरबूजचे तुकडे अशा प्रकारे वेगळे होतील की सर्व बिया एका सरळ रेषेत बाहेरच्या बाजूला दिसू लागतील. यामुळे तुम्हाला पूर्ण टरबूजमध्ये चाकू मारून बिया शोधण्याची गरज पडणार नाही.
advertisement
6/8
4. चमच्याने करा 'क्लीन स्वीप' एकदा का तुम्ही टरबूजचे छोटे स्लाईस केले की, बिया काढणं मुलांचा खेळ वाटू लागेल. बिया आधीच एका रेषेत कडेला आलेल्या असल्याने, फक्त एका चमच्याने किंवा चाकूच्या टोकाने त्यांना हलकेच खरवडून काढा. बिया एकाच ओळीत असल्याने त्या एका फटक्यात बाहेर येतात आणि मागे उरतो तो फक्त रसाळ, बिया विरहित लाल गर.
advertisement
7/8
उन्हाळ्यात कलिंगड खाण्याचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ही जपानी पद्धत नक्कीच गेम चेंजर ठरू शकते. यामुळे वेळेची बचत तर होतेच, शिवाय कलिंगड वाया जाण्याचे प्रमाणही कमी होते. तर पुढच्या वेळी कलिंगड आणल्यावर जुन्या पद्धतीने कापण्याऐवजी हे 'स्मार्ट' गणित नक्की वापरून पहा.
advertisement
8/8
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही, आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Watermelon : कलिंगड कापण्याची जपानी पद्धत माहितीय का? विना झंझट निघतील आतील बिया
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल