Science : अचानक शिंका का येते? शरीर देत असलेला हा सिग्नल ओळखा
- Published by:Devika Shinde
Last Updated:
शरीर नक्की कोणत्या संकटाचा सामना करतंय आणि शिंकेच्या माध्यमातून तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करतंय, हे जाणून घेणं खूप रंजक आहे.
advertisement
1/8

सतत आणि अचानक येणाऱ्या शिंकांमुळे अनेकदा आपण वैतागतो. कधी सार्वजनिक ठिकाणी शिंका आल्या की आपल्याला संकोच वाटतो, तर कधी 'कोणीतरी आपली आठवण काढत आहे' असं म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. पण, विज्ञानाच्या नजरेतून पाहिलं तर शिंक येणं ही काही साधीसुधी गोष्ट नाही. शरीर नक्की कोणत्या संकटाचा सामना करतंय आणि शिंकेच्या माध्यमातून तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करतंय, हे जाणून घेणं खूप रंजक आहे.
advertisement
2/8
शिंक येणं ही शरीराची एक स्वयंचलित आणि अत्यंत महत्त्वाची 'बचाव यंत्रणा' आहे. ज्याप्रमाणे घराचा दरवाजा सुरक्षित ठेवण्यासाठी आपण 'अलार्म' लावतो, त्याचप्रमाणे नाक आणि फुफ्फुसांच्या सुरक्षिततेसाठी निसर्गाने आपल्याला 'शिंक' दिली आहे.
advertisement
3/8
आपल्या नाकाच्या आत एक अतिशय नाजूक पडदा असतो. जेव्हा हवेवाटे धूळ, धूर, परागकण किंवा एखादा बारीक कीटक नाकात शिरतो, तेव्हा नाकातील मज्जातंतू मेंदूला तातडीचा संदेश पाठवतात. मेंदू लगेच फुफ्फुसांना जोरात हवा बाहेर फेकण्याचा आदेश देतो. ही हवा इतक्या वेगाने बाहेर पडते की नाकातील तो कचरा क्षणात बाहेर फेकला जातो. यालाच आपण 'शिंक' म्हणतो.
advertisement
4/8
जर तुम्हाला वारंवार शिंका येत असतील, तर त्याचा अर्थ असा असू शकतो की तुमच्या शरीरात व्हायरस किंवा बॅक्टेरिया शिरण्याचा प्रयत्न करत आहेत. सर्दी किंवा फ्लूची सुरुवात होण्यापूर्वी शरीर शिंकेच्या माध्यमातून त्या विषाणूंना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतं.
advertisement
5/8
तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल, पण जगात 18 ते 35 टक्के लोक असे आहेत, जे प्रखर सूर्यप्रकाशात गेल्यावर अचानक शिंकू लागतात. याला 'फोटिक स्नीझ रिफ्लेक्स' म्हणतात. जेव्हा डोळ्यांवर जोरात प्रकाश पडतो, तेव्हा डोळ्यांचे मज्जातंतू चुकून नाकाच्या मज्जातंतूंना सिग्नल देतात आणि शिंक येते. हे पूर्णपणे अनुवांशिक असते.
advertisement
6/8
काही तीव्र वास, जसे की परफ्यूम, अगरबत्ती किंवा मसाल्यांचा तिखट वास नाकातील आवरणाला उत्तेजित करतो. या जळजळीपासून सुटका मिळवण्यासाठी शरीर शिंकेचा आधार घेते.
advertisement
7/8
विज्ञानानुसार, जेव्हा आपण शिंकतो तेव्हा हवा ताशी 160 किलोमीटर वेगाने नाकातून बाहेर पडते. एका शिंकेमध्ये जवळपास 40,000 थेंब असतात, जे हवेत लांबपर्यंत पसरू शकतात. म्हणूनच शिंकताना रुमाल वापरणं अत्यंत गरजेचं असतं.
advertisement
8/8
शिंक रोखण्याची चूक कधीही करू नकाअनेक लोक मोठ्या आवाजाच्या भीतीने किंवा शिष्टाचार म्हणून शिंक रोखून धरतात. पण असे करणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. शिंक रोखल्यामुळे-कानाच्या पडद्याला इजा होऊ शकते.-डोळ्यांमधील रक्तवाहिन्यांवर ताण येऊ शकतो.-मेंदूच्या नसांवर दाब वाढू शकतो.-थोडक्यात सांगायचे तर शिंक येणं हा मेंदूने शरीराला दिलेला 'क्लीनिंग' मोड आहे. त्यामुळे शिंक आली की समजा तुमचं शरीर स्वतःला स्वच्छ करतंय.