Soaked Almond Benefits : जास्तीत जास्त फायदे मिळवण्यासाठी बदाम किती तास भिजवून खावे?
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी लोक अनेक प्रकारचे आरोग्यदायी पदार्थ खातात. यासाठी लोक हिरव्या भाज्या, ताजी फळे आणि ड्रायफ्रुट्स देखील खातात. बदाम अत्यंत आरोग्यदायी ड्राय फ्रूट मानले जातात. बदामामध्ये अनेक पोषक तत्त्व असतात. बदाम कोरडे खाण्यापेक्षा ते भिजवून खाणे जास्त फायदेशीर असते. पण बदाम किती वेळ भिजवावे, हे देखील जाणून घेणं आवश्यक आहे.
advertisement
1/7

पचनासाठी फायदेशीर : रोज भिजवलेले बदाम खाल्ल्याने पचनक्रिया मजबूत होते. हे पोटासाठी फायदेशीर आहे. यामुळे पोट चांगले साफ होते. भिजवलेले बदाम खाल्ल्याने गॅस, फुगवणे, अपचन यांसारख्या समस्यांपासून सुटका मिळते.
advertisement
2/7
मधुमेह नियंत्रित करते : बदामामध्ये फायबर, प्रोटीन, व्हिटॅमिन ई यासह अनेक पोषक घटक असतात. हे <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/health-tips-eating-rice-will-not-increase-sugar-and-weight-just-cook-rice-in-this-way-mhpj-1184691.html">रक्तातील साखर नियंत्रित करते.</a> याच्या सेवनाने शरीर निरोगी राहते.
advertisement
3/7
खराब कोलेस्ट्रॉल कमी करते : बदामाच्या सेवनाने खराब <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/high-cholesterol-problem-will-be-reduced-just-do-these-things-to-keep-heart-healthy-mhpj-1150238.html">कोलेस्ट्रॉलची पातळी</a> कमी होते. खराब कोलेस्टेरॉल वाढल्याने हृदयाचे नुकसान होते. बदामाचे सेवन केल्याने हृदय निरोगी राहते. त्यामुळे फळांचे आरोग्य चांगले राहते.
advertisement
4/7
त्वचेसाठी फायदेशीर : बदामामध्ये व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात असते. याशिवाय बदामामध्ये अनेक दाहक-विरोधी गुणधर्म असतात. जे त्वचेसाठी फायदेशीर आहे. याच्या सेवनाने कोरड्या त्वचेच्या समस्येपासून आराम मिळतो. रोज भिजवलेले बदाम खाल्ल्याने त्वचेशी संबंधित अनेक आजारांपासून बचाव होतो. भिजवलेले बदाम रोज रिकाम्या पोटी खाल्ल्याने तुमच्या चेहऱ्याची चमक वाढू शकते.
advertisement
5/7
ऊर्जा वाढते : बदाम खाल्ल्याने शरीरात ऊर्जा वाढते. त्यात अनेक जीवनसत्त्वे आणि पोषक घटक असतात. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. हे खाल्ल्याने शरीराला त्वरित ऊर्जा मिळते.
advertisement
6/7
तज्ञांच्या मते, बदाम किमान 8 ते 12 तास पाण्यात भिजवले पाहिजेत. भिजवलेले बदाम खाण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे 3-4 बदाम रात्रभर भिजवून सोलून सकाळी खावेत.
advertisement
7/7
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Soaked Almond Benefits : जास्तीत जास्त फायदे मिळवण्यासाठी बदाम किती तास भिजवून खावे?