Morning Habits : सकाळी रिकाम्यापोटी 'हे' पदार्थ अजिबात खाऊ नका! छोट्याशा चुकीने दिवसभर राहाल त्रस्त
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
आपण रोज सकाळी उठल्यावर काय खातो, यावर आपला संपूर्ण दिवस कसा जाईल हे आवलंबून असतं. सकाळी रिकाम्यापोटी आपण काही चुकीचे पदार्थ खाल्ले, जे आपल्या पोटाला ताण देऊ शकतात. तर आपला संपूर्ण दिवस त्रासात जाऊ शकतो.
advertisement
1/7

पोट स्वच्छ आणि हलकं राहण्यासाठी योग्य आहार घेणं आवश्यक आहे. सकाळी नाश्त्यात योग्य पदार्थ खाल्ल्यानं पोटाला त्रास होत नाही. रिकाम्या पोटी काही विशिष्ट पदार्थ आणि पेयं अजिबात घेऊ नका. कारण यामुळे पोटाच्या समस्या होऊ शकतात.
advertisement
2/7
सकाळी रिकाम्या पोटी सोडा आणि शीतपेय पिणं योग्य नाही. कारण त्यातल्या कार्बन डायऑक्साइड वायूमुळे पोटातील दाब वाढतो आणि मग पोट फुगणं, ढेकर आणि आम्लपित्त असे त्रास होऊ शकतात. शिवाय गोड कार्बोनेटेड ड्रिंक्समुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू शकते. म्हणूनच हे सकाळी पिणं योग्य नाही.
advertisement
3/7
सकाळी रिकाम्यपोटी गोड, मसालेदार आणि तळलेले पदार्थही अजिबात खाऊ नका. कारण गोड पदार्थांमुळे रक्तातील साखर आणि इन्सुलिन अचानक वाढतं. ज्यामुळे आपली ऊर्जा कमी होते. मसालेदार किंवा तळलेले पदार्थ खाल्ल्याने छातीत जळजळ, आम्लपित्त आणि अतिसार असे त्रास होऊ शकतात. तसेच शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स आणि पाणी कमी होतं.
advertisement
4/7
सकाळी सकाळी काहीच न खाता पिता चहा, कॉफी पिणं आपण टाळलंच पाहिजे. रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्यानं पोटातील गॅस्ट्रिन हार्मोन वाढतो आणि पोटातील आम्लाची पातळी वाढते. यामुळे छातीत जळजळ, पोटफुगी, उलट्या किंवा ॲसिड रिफ्लक्स होऊ शकतो. पोट हायड्रेटेड ठेवण्यासाठी कॉफी पिण्यापूर्वी काही प्रोटीन किंवा फॅट्स असलेले पदार्थ खा. तुम्ही उकडलेली अंडी किंवा नट बटर खाऊ शकता.
advertisement
5/7
दह्यामध्ये प्रीबायोटिक्स आणि लॅक्टिक ॲसिड असतात. हे पचनासाठी चांगले असतात. पण तेच तुम्ही रिकाम्या पोटी खाल्लं तर आम्लामुळे पोटातील फायदेशीर जीवाणू नष्ट होऊ शकतात. रिकाम्या पोटी दही खाल्ल्याने पोटात हायड्रोक्लोरिक आम्लाचं उत्पादन वाढतं. यामुळं आम्लपित्त होऊ शकतं. म्हणून डॉक्टर सांगतात दह्याचे फायदे घेण्यासाठी ते नेहमी जेवणानंतर खा.
advertisement
6/7
सकाळी रिकाम्यापोटी संत्री, पेरू आणि ग्रेपफ्रूट अशी लिंबूवर्गीय फळं खाऊ नका आणि ज्यूसही पिऊ नका. कारण यामुळे पचन बिघडू शकतं. लिंबूवर्गीय फळांमध्ये सायट्रिक ॲसिडचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळं हे पोटातील ॲसिडचं वाढवतं आणि गॅस्ट्रायटीस, अल्सर अशा आजारांचा धोका वाढतो.
advertisement
7/7
रिकाम्या पोटी जसे काही पदार्थ खाल्ल्याने आपल्या आरोग्याचं नुकसान होऊ शकतं त्याचप्रमाणे काही औषधं खाल्ल्यानेही आपल्याला त्रास होऊ शकतो. म्हणूनच कधीही रिकाम्यापोटी वेदनाशामक गोळ्या खाऊ नका. कारण यामुळं गॅस्ट्रायटीस किंवा पोटात अल्सर होऊ शकतात. (Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Morning Habits : सकाळी रिकाम्यापोटी 'हे' पदार्थ अजिबात खाऊ नका! छोट्याशा चुकीने दिवसभर राहाल त्रस्त