TRENDING:

Summer Tips : उन्हाळ्यात कितीही चांगलं वाटलं तरी फ्रिजचं थंड पाणी टाळा; अन्यथा होतील हे दुष्परिणाम

Last Updated:
सध्या उन्हाळा सुरू आहे आणि कडक ऊन पडतंय. या उन्हापासून व उकाड्यापासून बचावासाठी घरात एसी, कूलर लावले जातात, याचबरोबर थंड पाण्यासाठी फ्रीजमध्ये बाटल्या ठेवल्या जातात. उन्हाळ्यात थंड पाणी प्यायला चांगलं वाटत असेल तरी फ्रीजचं पाणी पिणं टाळायला हवं, कारण त्याचे खूप तोटे आहेत. फ्रीजचे पाणी पिण्याचे कोणते दुष्परिणाम आहेत, ते जाणून घेऊयात.
advertisement
1/9
उन्हाळ्यात कितीही चांगलं वाटलं तरी फ्रिजचं थंड पाणी टाळा; होतील हे दुष्परिणाम
कडक उन्हात प्यायला थंड पाणी मिळालं की अजून काय हवं? उन्हातून आल्यावर थंड पाणी प्यायल्याने खूप बरं वाटतं. उन्हाळ्यात फ्रीज उघडून पाहिल्यास त्यात सर्वात जास्त पाण्याच्या बाटल्या दिसतात. मात्र हे थंड पाणी तुमच्या आरोग्यासाठी खूप घातक ठरू शकतं.
advertisement
2/9
घसा खवखवणे : जास्त थंड पाणी प्यायल्याने घशाशी संबंधित समस्या वाढू शकतात. थंड पाण्यामुळे घसा आतून सूजु शकतो, तसंच घसा खवखवू शकतो, ज्यामुळे घसा दुखणं आणि खोकला होऊ शकतो.
advertisement
3/9
पचन समस्या : जास्त थंड पाणी पिण्याचा पचनसंस्थेवर नकारात्मक परिणाम होतो. थंड पाण्यामुळे पोटाच्या आतील भिंती आकुंचन पावतात, त्यामुळे पचनक्रिया मंदावते. नंतर गॅस, ब्लॉटिंग आणि पचनाच्या इतर समस्या उद्भवू शकतात.
advertisement
4/9
सर्दी व खोकला : फ्रीजचे थंड पाणी प्यायल्याने शरीराचे तापमान अचानक कमी होऊ शकतं, ज्यामुळे सर्दी-खोकल्याचा धोका वाढतो. खासकरून ज्यांची इम्युनिटी खूप कमकुवत आहे, त्यांच्यासाठी फ्रीजचं पाणी पिणं धोकादायक आहे.
advertisement
5/9
हृदयाचं आरोग्य : काही अभ्यासानुसार, खूप जास्त थंड पाणी प्यायल्याने हृदयाची गती नियंत्रित करणाऱ्या व्हेगस नर्व्हवर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे हृदयाचे ठोके अनियमित होऊ शकतात आणि हृदयाशी संबंधित समस्या वाढू शकतात.
advertisement
6/9
शरीराचं तापमान असंतुलित होतं : अत्यंत थंड पाणी प्यायल्याने शरीराचे तापमानात असंतुलित होऊ शकतं. जेव्हा आपण थंड पाणी पितो तेव्हा ते पाणी गरम करण्यासाठी शरीराला अतिरिक्त ऊर्जा लागते, ज्यामुळे शरीराचं तापमान असंतुलित होऊ शकतं.
advertisement
7/9
दातांची सेन्सिटिव्हिटी : थंड पाणी प्यायल्याने दातांची सेन्सिटिव्हिटी खूप जास्त वाढू शकते. खासकरून जे लोक आधीच दातांच्या इतर समस्यांमुळे ग्रस्त आहेत, त्यांच्यासाठी थंड पाणी प्यायल्यानंतर दातांच्या समस्या आणखी वाढू शकतात.
advertisement
8/9
लहान लागणं : थंड पाणी प्यायल्याने तहान भागत नाही, उलट त्यामुळे जास्त तहान लागू शकते. त्यामुळेच थंड पाणी प्यायल्याने शरीराला समाधान मिळत नाही आणि आपल्याला वारंवार तहान लागते.
advertisement
9/9
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Summer Tips : उन्हाळ्यात कितीही चांगलं वाटलं तरी फ्रिजचं थंड पाणी टाळा; अन्यथा होतील हे दुष्परिणाम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल