Ragi Mocha Milk Cake : गोड खायचंय पण साखर नको? बनवा हा 'नो बेक-नो शुगर' रागी मोचा मिल्क केक! झटपट होईल तयार
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
No sugar ragi mocha milk cake recipe : गोड खायला कोणाला आवडत नाही. पण बऱ्याच लोकांना मधुमेह किंवा इतर कारणांमुळे गोड खायला चालत नाही, तर काही लोक फिटनेस फ्रिक असतात, त्यामुळे साखर खाणं टाळला. मात्र तरीही गोड खाण्याची इच्छा सर्वांचीच असते. अशावेळी एखादा असा पदार्थ हवा, जो गोड असेल मात्र त्यामध्ये साखर नसेल. चला पाहूया अशीच एक भन्नाट रेसिपी.
advertisement
1/7

साखर नसलेले गोड पदार्थ बनवणं बऱ्याच लोकांना कंटाळवाणं वाटतं. कारण साखरेव्यतिरिक्त दुसरं काही टाकायचा म्हटलं खूप वेळ आणि किचकट प्रोसेस करावी लागते. मात्र आज माही तुम्हाला एक अगदी सोपी हेल्दी आणि तितकीच टेस्टी रेसिपी सांगणार आहोत. ही रेसिपी म्हणजे 'नो बेक-नो शुगर' रागी मोचा मिल्क केक. चला पाहूया तो कसा बनवायचा.
advertisement
2/7
याच्या नावातच काळात की हा केक किती हेल्दी आहे. कारण यामध्ये रागी म्हणजेच नाचणी आहे. शिवाय हा केक बेक केला जात नाही आणि यामध्ये साखरही घातली जात नाही. हा एक अतिशय स्वादिष्ट आणि तितकाच हेल्दी गोड पदार्थ आहे. हाल पाहूया रेसिपी.
advertisement
3/7
रागी मोचा मिल्क केक बनवण्यासाठी तुम्हाला नाचणीचे पीठ 1/2 कप, कमी चरबीयुक्त दूध दीड कप, इन्स्टंट कॉफी पावडर 1 टीस्पून, कोको पावडर 1 टीस्पून, गूळ पावडर किंवा खजूर पेस्ट 2 टेबलस्पून, वेलची 1/4 टीस्पून, बेकिंग सोडा 1/2 टीस्पून, मीठ 1/2 टीस्पून आणि पॅन ग्रीस करण्यासाठी तूप लागेल.
advertisement
4/7
केक बनवण्यासाठी जाड पॅनमध्ये मंद आचेवर दूध गरम करा. त्यामध्ये कॉफी पावडर आणि कोको पावडर घाला. हे साहित्य विरघळेपर्यंत ढवळत राहा. नंतर यामध्ये हळूहळू नाचणीचे पीठ घाला. यामध्ये गुठळ्या होऊ देऊ नका. गॅस मंद ठेवा आणि ते घट्ट होईपर्यंत थोडे शिजू द्या.
advertisement
5/7
नंतर त्यात वेलची पूड, मीठ आणि पर्यायी गूळ किंवा खजूर पेस्ट घाला आणि सर्व मिक्स करा. आता चिमूटभर बेकिंग सोडा घाला. आता सर्व मिश्रण व्यवस्थित हलवा. एक लहान वाटी किंवा ट्रे घ्या आणि त्याला तूप लावा.
advertisement
6/7
तूप लावलेल्या ट्रे किंवा वाटीमध्ये हे मिश्रण घाला आणि ते व्यवस्थित सेट करा. आता ते थंड होऊ द्या आणि खोलीच्या तपमानावर 30-40 मिनिटे सेट करा. हे थंड आणि सेट झाल्यावर तुम्ही त्याचे तुकडे करून सर्व्ह करू शकता.
advertisement
7/7
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Ragi Mocha Milk Cake : गोड खायचंय पण साखर नको? बनवा हा 'नो बेक-नो शुगर' रागी मोचा मिल्क केक! झटपट होईल तयार