TRENDING:

Nashik Accident :हसतं खेळतं कुटुंब एका क्षणात संपलं, दिंरोडीतील भीषण अपघाताचे PHOTO

Last Updated:
नाशिकजवळ दिंडोरी येथे दरगोडे कुटुंबाची इर्टिगा कार उघड्या विहिरीत कोसळून सहा मुलांसह नऊ जणांचा मृत्यू, पोलिस तपास सुरू
advertisement
1/6
Nashik Accident :हसतं खेळतं कुटुंब एका क्षणात संपलं, दिंरोडीतील भीषण अपघाताचे PHOTO
एका खाजगी क्लासच्या गेट टुगेदर पार्टीचा आनंद साजरा करून घरी परतणाऱ्या या कुटुंबाची कार थेट विहिरीत कोसळली. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ९ जणांचा जागीच दुर्दैवी अंत झाला. मृतांमध्ये ६ निष्पाप मुलांचा समावेश असल्याने संपूर्ण नाशिक जिल्हा हळहळत आहे.
advertisement
2/6
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या दरगोडे कुटुंब शुक्रवारी रात्री दिंडोरी शहरातील एका खाजगी क्लासच्या गेट टुगेदर पार्टीसाठी आले होते. मुलं आणि पालक असा हा उत्साही गट इर्टिगा कारने (MH 15 FT 5293) रात्री १०:३० च्या सुमारास घराकडे निघाला.
advertisement
3/6
मात्र, शिवाजीनगर परिसरातून जात असताना चालकाचा ताबा सुटला आणि भरधाव कार राजेंद्र राजे यांच्या उघड्या विहिरीत जाऊन कोसळली. अपघात झाला तेव्हा विहीर पाण्याने तुडुंब भरलेली होती आणि सगळीकडे किर्रर्र अंधार होता. स्थानिक नागरिक मदतीसाठी धावले, पण कार पूर्णपणे पाण्यात बुडाली होती.
advertisement
4/6
रात्री सव्वा बाराच्या सुमारास कार विहिरीबाहेर काढण्यात आली, पण तोपर्यंत कारमधील नऊही जणांचा श्वास थांबला होता. दिंडोरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून दोन 'हायड्रा क्रेन' आणि गावातील पोहणाऱ्या तरुणांच्या मदतीने बचावकार्य सुरू केलं.
advertisement
5/6
यामध्ये रेश्मा सुनील दरगुडे (२७), आशा अनिल दरगुडे (३२) आणि सुनील दत्तू दरगुडे (३२) या मोठ्या माणसांसह खुशी (१४), श्रेयस (११), राखी (११), श्रावणी (११), समृद्धी (७) आणि माधुरी (१३) या सहा लहान मुलांचा समावेश आहे. एकाच घरातील इतकी माणसं एकाच वेळी गेल्याने इंदोरे गावावर जणू आभाळच फाटलं आहे.
advertisement
6/6
रस्त्यालगत असलेल्या उघड्या विहिरी पुन्हा एकदा निष्पाप जीवांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्या आहेत. जर या विहिरीला संरक्षक कठडा असता, तर कदाचित आज या सहा मुलांचं भविष्य आणि दरगोडे कुटुंबाचा आधार वाचला असता. पोलिसांनी सध्या या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Nashik Accident :हसतं खेळतं कुटुंब एका क्षणात संपलं, दिंरोडीतील भीषण अपघाताचे PHOTO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल