TRENDING:

Cholesterol : वाढतं कोलेस्ट्रॉल ठरू शकत हार्ट अटॅकच कारण, किचनमधले 'हे' 6 मसाले करू शकतात कंट्रोल

Last Updated:
आजच्या जीवनशैलीमुळे कोलेस्ट्रॉल वाढण्याची समस्या सामान्य झाली आहे. रक्तात खराब कोलेस्ट्रॉल वाढल्यास ते रक्तवाहिन्यांमध्ये जमा होते, ज्यामुळे अडथळे निर्माण होतात आणि हार्ट अटॅक किंवा हृदयविकाराचा धोका वाढतो.
advertisement
1/7
वाढतं कोलेस्ट्रॉल ठरू शकत हार्ट अटॅकच कारण, किचनमधले 6 मसाले करू शकतात कंट्रोल
हार्ट अटॅक</a> किंवा हृदयविकाराचा धोका वाढतो. पण, ही समस्या टाळण्यासाठी महागड्या औषधांची गरज नाही, तुमच्या स्वयंपाकघरातील काही मसाले यात खूप मदत करू शकतात." width="750" height="422" /> आजच्या जीवनशैलीमुळे कोलेस्ट्रॉल वाढण्याची समस्या सामान्य झाली आहे. रक्तात खराब कोलेस्ट्रॉल वाढल्यास ते रक्तवाहिन्यांमध्ये जमा होते, ज्यामुळे अडथळे निर्माण होतात आणि हार्ट अटॅक किंवा हृदयविकाराचा धोका वाढतो. पण, ही समस्या टाळण्यासाठी महागड्या औषधांची गरज नाही, तुमच्या स्वयंपाकघरातील काही मसाले यात खूप मदत करू शकतात.
advertisement
2/7
लसूण : लसूण केवळ जेवणाची चवच वाढवत नाही, तर तो खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहे. रोज सकाळी रिकाम्या पोटी लसणाच्या 2-3 पाकळ्या खाल्ल्याने खूप फायदा होतो.
advertisement
3/7
हळद : हळदीमध्ये करक्यूमिन नावाचा घटक असतो, जो एक शक्तिशाली अँटिऑक्सिडंट आहे. हळद रक्तवाहिन्यांमधील सूज कमी करते आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते.
advertisement
4/7
मेथीचे दाणे : मेथीच्या दाण्यांमध्ये विरघळणारे फायबर भरपूर प्रमाणात असते. हे फायबर कोलेस्ट्रॉलला शरीरात शोषले जाण्यापासून रोखते. मेथीचे दाणे रात्रभर भिजत ठेवून सकाळी त्याचे पाणी पिणे फायदेशीर ठरते.
advertisement
5/7
धने : धने देखील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करतात. तुम्ही धने पावडरचा वापर चहा किंवा भाज्यांमध्ये करू शकता.
advertisement
6/7
दालचिनी : दालचिनी रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल दोन्ही नियंत्रित ठेवण्यास मदत करते. याचा उपयोग जेवणात किंवा चहामध्ये करू शकता.
advertisement
7/7
आले : आले त्याच्या अँटिऑक्सिडंट गुणधर्मांमुळे ओळखले जाते. ते रक्ताभिसरण सुधारते आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करते. आल्याचा चहा पिणे हा एक चांगला पर्याय आहे. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Cholesterol : वाढतं कोलेस्ट्रॉल ठरू शकत हार्ट अटॅकच कारण, किचनमधले 'हे' 6 मसाले करू शकतात कंट्रोल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल