दिलीप प्रभावळकरांचा मराठीतील कल्ट क्लासिक सिनेमा; स्मशानात शूट केलेले हृदयद्रावक सीन
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Dilip Prabhavalkar : 'दशावतार' सिनेमा सध्या सर्वत्र चर्चेत आहे. दिलीप प्रभावळकर यांनी कोकणात संपूर्ण सिनेमाचं शूटींग केलं आहे. 34 वर्षांआधी आलेल्या एका सिनेमाचं शूटींग दिलीप प्रभावळकर यांनी स्मशानभूमीत केलं होतं.
advertisement
1/8

अभिनेते दिलीप प्रभावळकर यांचा दशावतार हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. त्यांच्या आजवरच्या सर्वात्कृष्ट सिनेमांपैकी हा एक सिनेमा मानला जात आहे.
advertisement
2/8
दिलीप प्रभावळकर हे बहुरंगी अभिनेते आहेत. त्यांनी आतापर्यंत काम केलेल्या सगळ्या भूमिका अजरामर झाल्या. त्यांच्या अशाच एक कल्ट क्लासिक सिनेमाचं आजही कौतुक होतं.
advertisement
3/8
1991 साली रिलीज झालेल्या त्यांच्या एका सिनेमाचं शूटींग चक्क मुंबईतील स्मशानभूमीत झालं होतं. दिलीप प्रभावळकर यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना हा किस्सा सांगितला.
advertisement
4/8
नवरात्रीनिमित्तानं मी पाहिलेली दुर्गा या सेगमेन्टमध्ये दिलीप प्रभावळकर म्हणाले, "मी पाहिलेली दुर्गा असं मला विचारलं गेलं तेव्हा माझ्या डोळ्यांसमोर आली स्मिता तळवळलकर. तिला मी खूप लहानपणापासून ओळखत होतो."
advertisement
5/8
"ती नात्यातील होती माझ्या. 14-15 वर्षांची असल्यापासून तिला मी बघत होती. तिचा प्रवास मी पाहिलेला आहे. तिच्याबरोबर चौकट राजा हा सिनेमा करत होती. ती त्या सिनेमाची निर्माती आणि अभिनेत्रीही होती."
advertisement
6/8
दिलीप प्रभावळकर पुढे म्हणाले, "या सिनेमात मी माझ्या आईला अग्नी देतो असा एक हृदयद्रावर सीन होता. आमचे आर्ट डायरेक्टर अजित दांडेकरने रवींद्रनाट्य मंदिराच्या आवारात ते स्मशान उभं करण्याचा प्रयत्न केला. पण ते काही मनासारखं होईना. संजय सुरकर दिग्दर्शक होते. "
advertisement
7/8
"स्मिता म्हणाली की, आपण खऱ्या स्मशानात हे शूटींग करूया. तिने खऱ्या स्मशानात शूटींग केलं. अत्यंत कठीण आणि हृदयद्रावर तो सीन फक्त स्मिता पुढाकारामुळे दादरच्या स्मशानात तो सीन शूट करायला लावला."
advertisement
8/8
"कोणत्याही गोष्टीवर मात करण्याची तिची शक्ती मी जवळून पाहिली आहे. तिला बरा न होणारा रोग झाली. ती अकाली गेली. पण ती माझ्या कायम लक्षात राहिल. बऱ्याच अर्थाने ती दुर्गा होती", असंही दिलीप प्रभावळकर यांनी सांगितलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
दिलीप प्रभावळकरांचा मराठीतील कल्ट क्लासिक सिनेमा; स्मशानात शूट केलेले हृदयद्रावक सीन