सोलापूर - सोलापूर शहर आणि जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला आहे.सिना नदीला महापूर आल्याने हजारो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेली आहे.तूर,उडीद ,सोयाबीन,ऊसपीक पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झाले आहे.सोलापूर जिल्ह्यातील नंदूर गावात शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झाले आहे.नंदूर गाव सिना नदीलगत असल्याने गावात पाणी शिरले आहे.गावातील संपूर्ण शेती पाण्याखाली गेली आहे.