TRENDING:

खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही, संपूर्ण गाव 72 तास पाण्याखाली; वाघेगव्हाण गावाचा Ground Report

धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्लाला जोरदार पाऊस झोडलं आहे. धाराशिवमध्ये होत असलेल्या मुसळधार पावसाने परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. वाघेगव्हाण गाव 72 तास पाण्याखाली होते. पुरामुळे गावात जनजीवन विस्कळीत झालं असून शेती आणि घरंही पाण्याखाली गेली आहे. गाव संपूर्ण पाण्याखाली गेलं असून गावातील स्थानिका गेल्या तीन दिवसांपासून उपाशी आहेत तर प्यायला पाणीही नाहीय. याच गावात सर्वात आधी आधी न्यूज18 लोकमतची टीम पोहचली आहे. पाहुयात या गावाचा Ground Report

Last Updated: September 24, 2025, 16:31 IST
Advertisement

श्वानतज्ज्ञांचा खास सल्ला! घरगुती पद्धतीने श्वानांना कशी द्यावी आंघोळ? Video

आपल्या श्वानांना स्वच्छ ठेवावे ही प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी बाजारामध्ये महागडे शाम्पू आणि साबण हे उपलब्ध आहेत. हे प्रॉडक्ट बाजारामध्ये महाग भेटतात आणि ते प्रत्येकाला घेणे परवडत नाहीत. यासाठी छत्रपती संभाजीनगरमधील श्वानतज्ञ डॉक्टर डॉ.अनिल दाभेकर उपाय सांगितले आहेत.

Last Updated: December 08, 2025, 14:53 IST

आई-वडिलांच्या कष्टाचं पांग फेडलं! १८ वर्षे ऊसतोडणाऱ्या बापाचा लेक पहिल्याच प्रयत्नात 'अग्निवीर'; बीडच्या शंकरची जिद्द पाहा!

पुणे

पुणे : ऊसतोड कामगाराच्या मुलाची भारतीय सैन्यात अग्निवीर म्हणून निवड झाली आहे. बीडच्या गांधनवाडी येथील शंकर इथापे याचे कुटुंब गेल्या तीन पिढ्यांपासून ऊसतोडणीचं काम करत आहे. बारामतीजवळील सोमेश्वर साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात शंकरचं कुटुंब गेल्या 18 वर्षांपासून ऊसतोडणीसाठी येत आहे. त्याच्या या प्रवासाबद्दल त्यांनी लोकल 18 ला माहिती दिली आहे.

Last Updated: December 08, 2025, 14:10 IST
Advertisement

पुण्यात हुडहुडी... भरलंय शालींचे प्रदर्शन, एक शाल तब्बल दोन लाखाची; बघ्यांची गर्दी आवरेना

पुणे

पुणे: पिंपरी-चिंचवडमधील नेहरू नगर परिसरातील H.A. Corner गार्डन याठिकाणी विविध राज्यांतील वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनात काश्मिरी स्पेशल शालींचे स्टॉल विशेष आकर्षण ठरत आहे.याठिकाणी असणारी तब्बल 1 लाख 75 हजार रुपये किंमतीची शाल सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. ही शाली पाहण्यासाठी पुणेकरांकडून मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.या काश्मिरी शालींबाबत माहिती समीर यांनी लोकल 18 ला दिली आहे.

Last Updated: December 08, 2025, 13:43 IST

Healthy Breakfast! रोजचा तोच नाश्ता खाऊन कंटाळलात? ट्राय करा ज्वारीचे हेल्दी आप्पे; पाहा रेसिपी!

मुंबई: रोज सकाळी नाश्त्याला पोहे आणि उप्पीट खाण्याचा अनेकांना कंटाळा येतो. दिवसभराची ऊर्जा याच सकाळच्या नाश्त्यातूनच मिळते. त्यामुळे झटपट आणि पौष्टिक नाश्त्याच्या शोधात असलेल्या गृहिणींसाठी एक उत्तम पर्याय आहे. आता ज्वारीच्या पिठाचे चवदार आणि हेल्दी आप्पे अवघ्या काही मिनिटांत तयार करता येणार आहेत. मुंबईतील गृहिणी वैशाली कांबळे यांनी ही सोपी रेसिपी सांगितली आहे.

Last Updated: December 08, 2025, 12:58 IST
Advertisement

मुंबईत अग्नितांडव, लाकडाच्या गोदामाला भीषण आग, घटनास्थळाचा VIDEO

मुंबईतून पुन्हा एकदा आगीची घटना घडली आहे.मुंबईच्या नागपाडा येथे लाकडावाला बाजाराला संध्याकाळच्या सुमारास अचानक लाकडाच्या गोडाऊनला आग लागली. बघता बघता आगीने रौद्ररुपधारण केलं. लाकडाचं गोदाम असल्यामुळे आगीचा भडका उडाला. या गोदामाच्या आजूबाजूला मोठी दाटवस्ती असल्याने भीतीचं वातावरण होतं. मात्र, वेळीच अग्निशमन दलाच्या 7 ते 8 गाड्या दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवलं. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र मालमत्तेचं मोठं नुकसान झालं आहे.

Last Updated: December 06, 2025, 21:56 IST
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही, संपूर्ण गाव 72 तास पाण्याखाली; वाघेगव्हाण गावाचा Ground Report
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल