Pune News: 1 जानेवारीनंतर रस्त्यावर गाडी काढण्याआधी हे वाचाच, नाहीतर भरावा लागेल मोठा दंड
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
पिंपरी-चिंचवड आरटीओच्या आकडेवारीनुसार, शहरात अद्यापही १० लाखांहून अधिक वाहनांनी ही प्लेट बसवलेली नाही.
पिंपरी-चिंचवड: जर तुमच्याकडे 2019 पूर्वीची जुनी गाडी असेल आणि अजूनही तुम्ही 'एचएसआरपी' नंबर प्लेट बसवली नसेल, तर सावधान! राज्य परिवहन विभागाने नंबर प्लेट बसवण्यासाठी तब्बल पाचव्यांदा मुदतवाढ दिली असून, आता 31 डिसेंबर 2025 नंतर कोणतीही सवलत दिली जाणार नाही. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून, म्हणजेच 1 जानेवारी 2026 पासून ज्या गाड्यांना ही नंबर प्लेट नसेल, त्यांच्यावर वायुवेग पथकाद्वारे (Flying Squad) मोठा दंड आकारला जाणार आहे.
शहरातील स्थिती चिंताजनक
पिंपरी-चिंचवड आरटीओच्या आकडेवारीनुसार, शहरात अद्यापही १० लाखांहून अधिक वाहनांनी ही प्लेट बसवलेली नाही. ६ डिसेंबरपर्यंत केवळ ४ लाख ४० हजार वाहनांचे काम पूर्ण झाले असून, मोठ्या संख्येने नागरिक अजूनही प्रतीक्षेत आहेत. अनेक वाहनधारकांनी नोंदणी करूनही त्यांना अद्याप नंबर प्लेट मिळालेली नाही, अशी परिस्थिती समोर आली आहे.
advertisement
उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचा इशारा
पिंपरी-चिंचवड आरटीओचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव यांनी स्पष्ट केलं आहे की, "१ जानेवारीपासून विना एचएसआरपी नंबर प्लेट असलेल्या वाहनांवर कठोर कारवाई केली जाईल. ज्या नागरिकांनी अद्याप प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांनी तत्काळ अपॉइंटमेंट घेऊन नंबर प्लेट बसवून घ्यावी, अन्यथा दंड भरण्याची तयारी ठेवावी."
कशी कराल नोंदणी?
view commentsज्या वाहनधारकांनी अजूनही नंबर प्लेट बसवलेली नाही, त्यांनी खालीलप्रमाणे कार्यवाही करावी: १. bookmyhsrp.com या अधिकृत संकेतस्थळावर जा. २. वाहनाचा नंबर, इंजिन आणि चेसिस नंबर नोंदवा. ३. तुमच्या सोयीनुसार केंद्र आणि अपॉइंटमेंटची वेळ निवडा. ४. ऑनलाईन शुल्क भरा (दुचाकीसाठी साधारण ₹४०० ते ₹६५०, तर चारचाकीसाठी ₹८०० ते ₹१३००). ५. ठरलेल्या दिवशी गाडी संबंधित केंद्रावर नेऊन नंबर प्लेट बसवून घ्या.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
December 08, 2025 11:30 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune News: 1 जानेवारीनंतर रस्त्यावर गाडी काढण्याआधी हे वाचाच, नाहीतर भरावा लागेल मोठा दंड


