सोनं नाणं नाही तर चोरांनी शेतातून चोरली अशी वस्तू की पाहून शेतकरीही हैराण, पायाखालची जमीन सरकली
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
वाळूज लक्ष्मी गायरान परिसरात रखमाजी आरगडे यांच्या शेतातील 6-7 क्विंटल कापूस विठ्ठल काळे आणि विठ्ठल आरगडे यांनी चोरी केला, तपास वंदना मुळे करत आहेत.
मागच्या काही दिवसांमध्ये चोरी-मारीच्या घटना वाढल्या आहेत. यामध्ये पोलिसांची घरंही सुटली नाहीत, अगदी घरापासून दुकानापर्यंत आणि AMT फोडण्यापासून ते गळ्यातली सोनसाखळी लांबवण्यापर्यंतच्या अनेक घटना समोर येत असतात. मात्र आता एक घटना अशी घडलीय की हा सगळा प्रकार पाहून शेतकरीच हैराण झाला. शेतात गेल्यावर त्याने जे पाहिलं ते पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली. वाळूज इथे लक्ष्मी गायरान परिसरातील शेतकऱ्याच्या शेतात चोरांनी हात साफ केले.
शेतकरी रखमाजी आरगडे यांच्या शेतातील साधारण 6-7 क्विंटल कापूस रातोरात चोरांनी गायब केला. मध्यरात्रीच्या सुमारास येऊन चोरांनी सगळा कापूस वेचून नेल्याची माहिती मिळाली आहे. ही धक्कादायक घटना समोर आल्यानंतर शेतकऱ्याने न्याय मागण्यासाठी तातडीनं पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या शेतात कपाशीची लागवड केली होती.
advertisement
ज्या मध्यरात्री हे घडलं त्या रात्री त्यांचे भाऊ दशरथ आरगडे हे आपल्या गव्हाच्या शेताला पाणी देत होते. त्यांनी दोघांना डोक्यावरुन कापसाचे गाठोडं घेऊन जाताना पाहिलं. दशरथ यांना त्यांना आरडाओरडा करून हटकण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन्ही चोर त्यांच्या हाताला लागले नाहीत. त्यांनी कापसाच्या गोणीसह पळ काढला. दुसऱ्या दिवशी शेतात जाऊन काय प्रकार ते पाहिल्यावर धक्का बसला.
advertisement
रखमाजी यांनी आपल्या शेतातून 6 क्विटलच्या आसपास कापूस चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली. या सगळ्याची चौकशी केल्यानंतर विठ्ठल काळे आणि विठ्ठल आरगडे ह्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ६ डिसेंबर रोजी पोलीस उपनिरीक्षक वंदना मुळे या पुढील तपास करत आहेत. या अजब चोरीची चर्चा सध्या गावभर होत आहे. सोनं चांदी नाही तर चक्क कापूस चोरल्याने गावभर चर्चा रंगली आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 08, 2025 11:24 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सोनं नाणं नाही तर चोरांनी शेतातून चोरली अशी वस्तू की पाहून शेतकरीही हैराण, पायाखालची जमीन सरकली


