Insta वर ओळख; सरकारी नोकरीचं दाखवलं स्वप्न, नंतर नाशिकच्या तरुणींसोबत घडलं भयानक
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
वन खात्यात नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने इन्स्टाग्राम खात्याद्वारे तरुणींशी संपर्क साधून त्यांची अस्सल छायाचित्रे आणि कागदपत्रे मिळवल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला आहे.
नाशिक: वन खात्यात नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने इन्स्टाग्राम खात्याद्वारे तरुणींशी संपर्क साधून त्यांची अस्सल छायाचित्रे आणि कागदपत्रे मिळवल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला आहे. संशयिताने यानंतर तरुणींच्या छायाचित्रांशी छेडछाड (मॉर्फिंग) करून त्यांची अश्लील छायाचित्रे बनवली आणि ती व्हायरल करण्याची धमकी देत त्यांच्याकडे पैशांची मागणी करून खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला.
फसवणूक आणि धमकी
फिर्यादी पीडित तरुणी आणि तिच्या दोन मैत्रिणींशी 'कल्पेश- गिर आंधळे-०लव्ह ३९' या इन्स्टाग्राम खात्यावरून संपर्क साधण्यात आला. मेसेज, व्हॉटस्ॲप आणि फोनद्वारे संवाद साधून संशयिताने वन खात्यात नोकरी लावून देतो असे खोटे आमिष दाखवले आणि त्यांचा विश्वास संपादन केला. या बनावातून त्याने पीडित युवतींची अस्सल छायाचित्रे आणि महत्त्वाची कागदपत्रे प्राप्त केली.
advertisement
खंडणीचा डाव आणि बदनामीचा कट
संशयिताने यानंतर आपले खरे स्वरूप दाखवले.
advertisement
मॉर्फिंग: तिघींच्या अस्सल छायाचित्रांचा वापर करून त्यांची मॉर्फ केलेली अश्लील छायाचित्रे तयार केली.
ही अश्लील छायाचित्रे त्यांना पाठवून ती सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली.
advertisement
पैशांची मागणी
शिवीगाळ करत धमक्या देत त्यांच्याकडे पैशांची मागणी (खंडणी) केली. तसेच, पीडितांकडे आणखी अश्लील पद्धतीची छायाचित्रे पाठवण्याची मागणीही त्याने केल्याचे तक्रारीत नमूद आहे. खंडणी न मिळाल्याने संशयिताने बनवलेले काही खोटे अश्लील फोटो सोशल मीडियावर प्रसारित केल्याचेही फिर्यादीने तक्रारीत म्हटले आहे.
advertisement
या संपूर्ण प्रकरणाची माहिती फिर्यादी युवतीने नाशिक शहर सायबर पोलिस ठाण्यात दिली. तक्रारीवरून पोलिसांनी ''कल्पेश- गिर आंधळे-०लव्ह ३९' नावाच्या इन्स्टाग्राम खातेधारकाविरुद्ध खंडणी (Extortion), विनयभंग (Molestation) यांसह माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत (IT Act) गुन्हा दाखल केला आहे. नाशिक शहर सायबर पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
view commentsLocation :
Nashik,Maharashtra
First Published :
December 08, 2025 11:10 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
Insta वर ओळख; सरकारी नोकरीचं दाखवलं स्वप्न, नंतर नाशिकच्या तरुणींसोबत घडलं भयानक


