सनी देओलनं शेअर केला धर्मेंद्र यांचा मृत्यूआधीचा तो VIDEO, 'ही-मॅन'च्या 90व्या वाढदिवशी झाला इमोशनल

Last Updated:
अभिनेता सनी देओलनं धर्मेंद्र यांच्या निधनानंतर 15 दिवसांनी सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून सगळेच भावुक झालेत.
1/9
अभिनेते धर्मेंद्र यांची आज 90वी जयंती. 90व्या वाढदिवसाच्या 15 दिवस आधीच त्यांनी या जगाचा निरोप घेतला. 24 नोव्हेंबर 2025 रोजी धर्मेंद्र यांचं निधन झालं. धर्मेंद्र यांच्या निधनानं देओल कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. 

advertisement
2/9
त्यांच्या निधनाच्या 15 दिवसांनी त्यांचा मोठा मुलगा अभिनेता सनी देओल भावुक झाला. धर्मेंद्र यांची मुलगी ईशा देओल हिच्यानंतर सनी देओल वडिलांच्या आठवणीत भावुक झाला आहे. 

3/9
अभिनेता सनी देओलने एक व्हिडीओ क्लिप शेअर केली आहे.  त्यात तो धर्मेंद्र यांना विचारतो,
अभिनेता सनी देओलने एक व्हिडीओ क्लिप शेअर केली आहे.  त्यात तो धर्मेंद्र यांना विचारतो, "पापा तुम्ही एन्जॉय करत आहात का?" त्यावर धर्मेंद्र यांच्या चेहऱ्यावर मोठं हसू येतं. ते आरामात आणि हसत हसत सनीला म्हणतात, "येस माय डिअर सन, मी खरोखर एन्जॉय करतोय. हे खूप सुंदर आहे."
advertisement
4/9
या व्हिडीओसह सनी देओलनं कॅप्शनमध्ये लिहिलंय,
या व्हिडीओसह सनी देओलनं कॅप्शनमध्ये लिहिलंय, "आज माझ्या वडिलांचा जन्मदिवस आहे. पप्पा नेहमी माझ्या सोबत आहेत. लव्ह यू पप्पा. मिस यू." सनी देओलनं शेअर केलेला व्हिडीओ पाहून चाहतेही भावुक झालेत.
advertisement
5/9
सनीने शेअर केलेला हा व्हिडीओ हा एक हिल स्टेशनवरील आहे. हा व्हिडीओ काही महिन्यांआधीचा असावा असा अंदाज चाहत्यांना लावला आहे.
सनीने शेअर केलेला हा हा एक हिल स्टेशनवरील आहे. हा व्हिडीओ काही महिन्यांआधीचा असावा असा अंदाज चाहत्यांना लावला आहे.
advertisement
6/9
अभिनेत्री ईशा देओलनं देखील वडिलांसाठी इमोशनल पोस्ट लिहिली आहे. तिने लिहिलंय, 
अभिनेत्री ईशा देओलनं देखील वडिलांसाठी इमोशनल पोस्ट लिहिली आहे. तिने लिहिलंय,  "टू माय डार्लिंग पप्पा. आपला करार, आपलं नातं सगळ्यात मजबूत आहे. मला तुमची खूप आठवण येते पप्पा… तुमची संरक्षण देणारी मिठी जणू मऊशार पांघरुणासारखी वाटायची."
advertisement
7/9
 "तुमची परंपरा अभिमानाने आणि सन्मानाने पुढे नेण्याचं मी वचन देते. आणि तुम्ही जसे मला प्रेम दिलं तसंच प्रेम तुम्हांवर प्रेम करणाऱ्या लाखो लोकांपर्यंत पोहोचवण्याचा मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करेन", असं वचनही ईशाने वडील धर्मेंद्र यांना दिलं.

8/9
धर्मेंद्र यांनी वयाच्या 89 व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. नोव्हेंबरच्या सुरुवातीला त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना डिस्चार्ज देऊन वैद्यकीय देखरेखीखाली घरी आणण्यात आलं. घरी आणल्यानंतर जवळपास 10-12 दिवसांनी त्यांचं निधन झालं. 

9/9
धर्मेंद्र यांच्या निधनाच्या तीन दिवसांनी त्यांची दुसरी पत्नी हेमा मालिनी यांनी त्यांच्या आठणींना उजाळा देत भावुक पोस्ट लिहिली होती. धर्मेंद्र यांना दोन पत्नी, चार दोन मुलगे आणि चार मुली. त्यांची तीन मुलं म्हणजेच, सनी, बॉबी आणि ईशा यांनी अभिनय क्षेत्रात करिअर केलं. त्यांची पहिली पत्नी आणि त्यांच्या दोन मुली नेहमीच लाइमलाइटपासून दूर राहिल्या.

Nanded Crime : बॉयफ्रेंडच्या मृतदेहाशी लग्न केलं, आंचलने सांगितलं थेट सांगितलं कारण, 'सक्षमसोबत...'
बॉयफ्रेंडच्या मृतदेहाशी लग्न केलं, आंचलने सांगितलं थेट सांगितलं कारण, 'सक्षमसोबत
  • बॉयफ्रेंडच्या मृतदेहाशी लग्न केलं, आंचलने सांगितलं थेट सांगितलं कारण, 'सक्षमसोबत

View All
advertisement