भंडाऱ्यातील दवाखान्यात तुफान राडा, पाच जणांनी घुसून दोघाना दगड-काठ्यांनी मारलं,नेमकं काय घडलं?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
भंडाऱ्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत लाखांदूर शहरातील साकोली रोडवरील असलेल्या कथित आयुर्वेदिक रुग्णालयात पाच जणांनी घुसून दोन तरूणांवर दगड-काठ्यांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे.
Bhandara News : सरवर शेख,प्रतिनिधी, भंडारा : भंडाऱ्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत लाखांदूर शहरातील साकोली रोडवरील असलेल्या कथित आयुर्वेदिक रुग्णालयात पाच जणांनी घुसून दोन तरूणांवर दगड-काठ्यांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. वैद्यकीय व्यवसायातील वादातून हा हल्ला झाल्याची माहिती आहे. या घटनेत दोन जण जखमी झाले आहेत. तसेच या घटनेनंतर मोठ्या प्रमाणावर जमाव घटनास्थळी जमा झाला होता.या जमावाने या घटनेतील काही आरोपींना पकडले होते. या घटनेचा अधिकचा तपास सूरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर शहरातील साकोली रोडवरील असलेल्या कथित आयुर्वेदिक रुग्णालयात मुळचे हरियाणाचे असलेले दिपक अमरपाल सिंग,लवली राजवीर कुमार,सुरेश प्रेमचंद कुमार,अमन बलवान सिंग, अभिषेक रिषीपाल पाच जण घुसले होते. दवाखान्यात शिरताच दिपक सिंग आणि लवली राजवीर यांनी प्लास्टिक टेबलचा पाया काढून अमृतपाल यांच्या चेहऱ्यावर व हातावर मारहाण करण्यास सुरूवात केली. सुरेश कुमार यांनी सिमेंटचे दगड फेकून दोघांवर हल्ला चढवला. इतर साथीदारांनीही बेदम मारहाण केली.
advertisement
या हल्ल्यात अमृतपाल सिंग गंभीर जखमी झाले असून त्यांच्या चेहऱ्यावर व हातावर मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. साक्षीदारांच्या मते, काही आरोपी बेसबॉल स्टिकने सुसज्ज होते.हल्ल्याची माहिती मिळताच नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी पोहोचले. तेव्हा नागरिकांनी धाडस दाखवत दिपक सिंग आणि लवली राजवीर कुमार यांना पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. यावेळी बाकीचे आरोपी पसार झाले होते. दरम्यान ताब्यात घेतलेल्या दोघांनी आपल्या अन्यासाथीदारांना लाखांदूर पोलीस ठाण्यात बनवून घेतले त्यानंतर लाखांदूर पोलिसांनी संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.या घटनेचा अधिक तपास सूरू आहे.
Location :
Bhandara,Maharashtra
First Published :
December 04, 2025 12:02 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
भंडाऱ्यातील दवाखान्यात तुफान राडा, पाच जणांनी घुसून दोघाना दगड-काठ्यांनी मारलं,नेमकं काय घडलं?


