Interesting Facts : हँग झालेला लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर Ctrl + Alt + Delete ने कसा सुटतो?
- Published by:Priya Lad
Last Updated:
How Laptop Hang Problem Solved : लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर अचानक हँग झाला Ctrl + Alt + Delete हा शॉर्टकर्ट विंडोज वापरणाऱ्यांसाठी एक लाइफसेव्हर मानला जातो. पण तो कसं काम करतो माहिती आहे का?
लॅपटॉप अचानक हँग होणं समस्या सामान्य झाली आहे. स्क्रीन फ्रीझ होणं, माऊस किंवा कीबोर्ड न चालणं... असं काही झालं की आपण सगळ्यात आधी काय करतो तर Ctrl + Alt + Delete. या तीन बटणांचा कॉम्बिनेशन एखाद्या जादूच्या मंत्रासारखं काम करतं आणि बहुतेक वेळा लॅपटॉप पुन्हा सामान्य स्थितीत येतो. पण हे नक्की कसं काम करतं? याचा विचार तुम्गी कधी केला आहे का?
advertisement
advertisement
advertisement
हँग झालेला लॅपटॉप म्हणजे काय?, सीपीयू बिझी आहे? एक अॅप क्रॅश झालं आहे, रॅम फुल झाली आहे, एखादा प्रोसेस अडकला आहे? नॉर्मल किबोर्ड इनपुट त्या हँग झालेल्या प्रोसेसपर्यंत पोहोचू शकत नाही. पण Ctrl + Alt + Delete मात्र ऑपरेटिंग सिस्टमच्या वरच्या लेव्हलवरून थेट किबोर्ड ड्रायव्हर ते विंडोज कर्नेल मार्गे ओळखलं जातं. म्हणजेच एखादा प्रोग्राम क्रॅश झाला तरीही हे की-कॉम्बिनेशन प्रोसेसच्या बाहेरून काम करतं.
advertisement
जर सिस्टम पूर्णपणे क्रॅश नसेल तर हे बटण दाबताच विंंडोज एमर्जन्सी स्क्रिन दाखवतो. ज्यात टास्क मॅनेजर, लॉक, स्विच युझर, साइन आऊट, रिस्टार्ट किंवा शटडाऊन असे ऑप्शन दिसतात. इथून आपण टास्क मॅनेजर म्हणजे विंडोजचं कंट्रोल रूम उघडू शकतो. इथून जास्त रॅम वापरणारे अॅप्स, न चालणारे फ्रिजिंग अॅप्स, बॅकग्राऊंडमध्ये अडकलेल्या प्रक्रिया यांना आपण एंड टास्क करू शकतो. एखादं अॅप सिस्टमला हँग करत असेल तर ते बंद केल्यावर लगेच संपूर्ण लॅपटॉप सामान्य स्थितीत येतो.
advertisement
advertisement


