रेल्वे विभागाचा महत्त्वाचा निर्णय, ख्रिसमस आणि हिवाळी पर्यटनासाठी पुण्यातून धावणार विशेष गाड्या, पाहा वेळापत्रक
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
रेल्वे विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पुणे–सांगानेर आणि पुणे–नागपूर या मार्गांवर विशेष गाड्यांच्या फेऱ्यांची घोषणा करण्यात आली आहे.
पुणे : येत्या काही दिवसांत ख्रिसमस आहे. या काळात अनेक जणांना सुट्ट्या असतात, तसेच हिवाळ्यातही अनेक जण पर्यटनासाठी बाहेर पडतात. त्यामुळे वाढणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन रेल्वे विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पुणे–सांगानेर आणि पुणे–नागपूर या मार्गांवर विशेष गाड्यांच्या फेऱ्यांची घोषणा करण्यात आली आहे.
रेल्वे विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुणे–सांगानेर मार्गावरील 01405 आणि 01406 या साप्ताहिक विशेष गाड्यांच्या आणखी सहा फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत. याशिवाय पुणे–नागपूर मार्गावरील 01401 आणि 01402 या गाड्यांच्या सहा अतिरिक्त फेऱ्यांनाही परवानगी देण्यात आली आहे.
पुणे–सांगानेर विशेष गाडी (01405) 19 आणि 26 डिसेंबर तसेच 2 जानेवारीला सकाळी 9.45 वाजता पुण्याहून सुटणार आहे. गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी 6.45 वाजता सांगानेर स्थानकात पोहोचेल.
advertisement
सांगानेर–पुणे (01406) ही गाडी 20 व 27 डिसेंबर आणि 3 जानेवारीला 11.35 वाजता सांगानेर येथून सुटेल आणि पुढील दिवशी रात्री साडेनऊच्या सुमारास पुण्यात पोहोचेल.
पुणे–नागपूर विशेष गाडी (01401) 19, 26 डिसेंबर आणि 2 जानेवारीला रात्री 8.30 वाजता पुण्याहून रवाना होईल. ही गाडी दुसऱ्या दिवशी दुपारी 2.05 वाजता नागपूरमध्ये पोहोचणार आहे.
advertisement
नागपूर–पुणे विशेष गाडी (01402) 20, 27 डिसेंबर आणि 3 जानेवारीला दुपारी 4.10 वाजता नागपूरहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 11.45 वाजता पुण्यात दाखल होईल.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 08, 2025 7:59 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
रेल्वे विभागाचा महत्त्वाचा निर्णय, ख्रिसमस आणि हिवाळी पर्यटनासाठी पुण्यातून धावणार विशेष गाड्या, पाहा वेळापत्रक


