इंडिगो विमानसेवा विस्कळतेमुळे रेल्वेचा मोठा निर्णय, मुंबईतून धावणार विशेष गाड्या, चेक करा वेळापत्रक
- Published by:Mohan Najan
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
गेले काही दिवस इंडिगो विमानसेवेची उड्डाणे मोठ्या प्रमाणात रद्द होत असल्याने हजारो विमानप्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. अचानक बदललेले फ्लाइट शेड्युल, रद्द झालेली उड्डाणे आणि वाढलेला प्रवासखर्च यामुळे अनेकांचे नियोजन विस्कळीत झाले.
मुंबई : गेले काही दिवस इंडिगो विमानसेवेची उड्डाणे मोठ्या प्रमाणात रद्द होत असल्याने हजारो विमानप्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. अचानक बदललेले फ्लाइट शेड्युल, रद्द झालेली उड्डाणे आणि वाढलेला प्रवासखर्च यामुळे अनेकांचे नियोजन विस्कळीत झाले. या परिस्थितीत प्रवाशांना दिलासा देण्यासाठी भारतीय रेल्वे पुढे सरसावली आहे आणि मध्य व पश्चिम रेल्वेतर्फे देशातील विविध महत्त्वाच्या मार्गांवर विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
हिवाळी सुट्ट्यांचा हंगाम सुरू असल्याने आधीच नियमित प्रवासी, पर्यटक आणि बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांची गर्दी वाढलेली आहे. त्यातच इंडिगो फ्लाइट रद्द झाल्यानंतर विमान प्रवासीही मोठ्या प्रमाणावर रेल्वेकडे वळले आहेत. यामुळे उपलब्ध क्षमतेत वाढ करण्यासाठी रेल्वेकडून विशेष गाड्यांची मालिका जाहीर करण्यात आली आहे.
advertisement
चालवल्या जाणाऱ्या प्रमुख विशेष गाड्या
1) मडगाव – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (01014)
8 डिसेंबर रोजी रात्री 12.30 वाजता मडगावहून सुटणारी ही गाडी त्याच दिवशी सकाळी 11.45 वाजता LTT येथे पोहोचणार.
2) CSMT – हावडा विशेष (02869)
8 डिसेंबर रोजी सकाळी 11.05 वाजता मुंबई CSMTहून सुटेल व 9 डिसेंबर रोजी रात्री 8.55 ला हावडा येथे पोहोचेल.
advertisement
3) लोकमान्य टिळक टर्मिनस – सियालदह विशेष (03128)
9 डिसेंबर रोजी सकाळी 6.30 वाजता LTTहून सुटेल आणि 10 डिसेंबर रोजी सायंकाळी 7.30 वाजता सियालदह येथे पोहोचेल.
4) लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर विशेष (05588)
9 डिसेंबर रोजी सकाळी 11.00 वाजता सुटेल; गोरखपूर येथे 10 डिसेंबर रात्री 8.15 वाजता आगमन.
5) लोकमान्य टिळक टर्मिनस – बिलासपूर विशेष (08246)
12 डिसेंबर रोजी रात्री 12.15 वाजता LTTहून सुटणारी ही गाडी त्याच दिवशी रात्री 8.15 वाजता बिलासपूर येथे पोहोचेल.
advertisement
प्रवाशांसाठी मोठा दिलासा
view commentsइंडिगो विमानसेवेतील विस्कळीततेमुळे अडकलेले हजारो प्रवासी आता रेल्वेचा सुरक्षित आणि निश्चित पर्याय निवडत आहेत. वाढत्या गर्दीचा विचार करून रेल्वेने त्वरित अतिरिक्त गाड्या सोडण्याचा घेतलेला निर्णय प्रवाशांसाठी मोठा दिलासा ठरत आहे. रेल्वे प्रशासनाने सांगितले की, आवश्यकता भासल्यास आणखी काही विशेष गाड्या सुरू करण्याचा विचारही केला जाईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 08, 2025 10:12 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
इंडिगो विमानसेवा विस्कळतेमुळे रेल्वेचा मोठा निर्णय, मुंबईतून धावणार विशेष गाड्या, चेक करा वेळापत्रक


