काय सांगता! खाऱ्या पाण्यापासून पेट्रोल आणि स्वस्त पाणी, किंमत फक्त 24 रुपये, पण मिळतंय कुठे?

Last Updated:

Seawater To Hydrogen : इथं समुद्राच्या पाण्याचा वापर पिण्यायोग्य गोड्या पाण्याच्या निर्मितीसाठी आणि भविष्यातील इंधन ग्रीन हायड्रोजन तयार करण्यासाठी केला जात आहे.

News18
News18
जग पिण्याच्या पाण्याच्या कमतरतेशी आणि पेट्रोल-डिझेलला ग्रीन एनर्जीच्या पर्यायांच्या गरजेशी झुंजत असताना चीनने दोन्ही लक्ष्यांवर एकाच दगडात मारा केला आहे. चीनच्या पूर्वेकडील प्रांत शेडोंगमध्ये एक क्रांतिकारी कारखाना उघडला आहे, ज्याने शास्त्रज्ञ आणि अर्थशास्त्रज्ञ दोघांनाही आश्चर्यचकित केलं आहे. इथं समुद्राच्या पाण्याचा वापर पिण्यायोग्य गोड्या पाण्याच्या निर्मितीसाठी आणि भविष्यातील इंधन ग्रीन हायड्रोजन तयार करण्यासाठी केला जात आहे.
साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या मते, शेडोंगमधील रिझाओ शहरात असलेली ही सुविधा जगातील पहिलीच आहे. ती पूर्णपणे समुद्राच्या पाण्यावर चालते आणि जवळच्या स्टील आणि पेट्रोकेमिकल कारखान्यांमधून येणारी उष्णता वापरते. याचा अर्थ असा की कारखान्यांमध्ये पूर्वी वाया जाणारी उष्णता आता पाणी आणि इंधन निर्मितीसाठी वापरली जात आहे.
एक इनपूट आणि तीन आउटपूट
रिपोर्टनुसार ही प्रणाली एक इनपूट, तीन आउटपूट या तत्त्वावर चालते. इनपूट समुद्राचे पाणी आणि टाकाऊ उष्णता असेल. तर पहिलं आऊटपूट गोडं पाणी, दरवर्षी 800 टन समुद्राच्या पाण्यावर प्रक्रिया करून 450 घनमीटर शुद्ध पाणी तयार केलं जातं. इतकं शुद्ध की ते पिण्यासाठीही वापरलं जाऊ शकतं. दुसरं आऊटपूट ग्रीन हायड्रोजन, यामुळे दरवर्षी 192000 घनमीटर ग्रीन हायड्रोजन तयार होतं. तिसरं आऊटपूट, ब्राइन, शेवटी 350 टन खनिजयुक्त खारं पाणी शिल्लक राहतं, जे सागरी रसायनं तयार करण्यासाठी वापरलं जातं.
advertisement
हायड्रोजन हे भविष्यातील इंधन मानलं जातं कारण त्यामुळे प्रदूषण होत नाही. पण ते तयार करण्यासाठी पूर्वी भरपूर वीज आणि अतिशय शुद्ध गोड्या पाण्याची आवश्यकता होती. खाऱ्या पाण्यामुळे मशीन खराब होतात. समुद्राच्या पाण्यात असलेले मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि क्लोराईड आयन यामुळे हायड्रोजन उत्पादक मशीन्स गंजतात किंवा त्यावर इलेक्ट्रोडवर जमा होतात. पण चीनमधील नवीन तंत्रज्ञानाने हा अडथळा दूर केला आहे. हे संयंत्र गोड्या पाण्याचा वापर न करता थेट समुद्राच्या पाण्यातून हायड्रोजन तयार करतं. रिझाओ सुविधा गेल्या तीन आठवड्यांपासून कोणत्याही व्यत्ययाशिवाय कार्यरत आहे, ज्यामुळे हे सिद्ध होतं की त्यांनी या तांत्रिक समस्येवर उपाय शोधला आहे.
advertisement
इथं उत्पादित होणारा हायड्रोजन दरवर्षी 3800 किलोमीटर चालण्यासाठी 100 बसेसना वीज पुरवण्यासाठी पुरेसा आहे. लाओशान प्रयोगशाळेतील वरिष्ठ अभियंता किन जियांगगुआंग म्हणाले, "हे फक्त हायड्रोजनने सिलेंडर भरणं नाही, समुद्रातून ऊर्जा काढण्याचा हा एक नवीन मार्ग आहे." हा शोध अशा देशांसाठी आशा निर्माण करतो ज्यांच्याकडे समुद्र आहे पण पिण्याचं पाणी आणि ऊर्जा संसाधने मर्यादित आहेत.
advertisement
सौदी आणि अमेरिकेपेक्षा स्वस्त पाणी
सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे हे तंत्रज्ञान इतकं स्वस्त आहे की ते जलसंपत्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या सौदी अरेबियाला आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज अमेरिकेलाही मागे टाकले आहे. या चिनी प्लांटने किमतीच्या बाबतीत मोठे जागतिक विक्रम मोडले आहेत. चीनमध्ये त्याची किंमत प्रति घनमीटर सुमारे 24 रुपये असेल, तर सौदी अरेबिया आणि युएईमध्ये, जिथं जगातील सर्वात स्वस्त पाणी तयार केलं जातं, त्याची किंमत सुमारे 42 रुपये आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील सर्वात मोठ्या प्लांटची किंमत देखील सुमारे 186 रुपये आहे. मनोरंजक गोष्ट म्हणजे बीजिंगमध्ये नळाच्या पाण्याची किंमत 5 युआन आहे, तर हे समुद्राचं पाणी त्यापेक्षा निम्म्या किमतीत, म्हणजे 2 युआनमध्ये तयार केलं जात आहे.
view comments
मराठी बातम्या/Viral/
काय सांगता! खाऱ्या पाण्यापासून पेट्रोल आणि स्वस्त पाणी, किंमत फक्त 24 रुपये, पण मिळतंय कुठे?
Next Article
advertisement
Nanded Crime : बॉयफ्रेंडच्या मृतदेहाशी लग्न केलं, आंचलने सांगितलं थेट सांगितलं कारण, 'सक्षमसोबत...'
बॉयफ्रेंडच्या मृतदेहाशी लग्न केलं, आंचलने सांगितलं थेट सांगितलं कारण, 'सक्षमसोबत
  • बॉयफ्रेंडच्या मृतदेहाशी लग्न केलं, आंचलने सांगितलं थेट सांगितलं कारण, 'सक्षमसोबत

  • बॉयफ्रेंडच्या मृतदेहाशी लग्न केलं, आंचलने सांगितलं थेट सांगितलं कारण, 'सक्षमसोबत

  • बॉयफ्रेंडच्या मृतदेहाशी लग्न केलं, आंचलने सांगितलं थेट सांगितलं कारण, 'सक्षमसोबत

View All
advertisement