मोठी बातमी! पश्चिम रेल्वेचा 60 दिवसांचा ब्लॉक जाहीर; वेळापत्रक पूर्णपणे बदलणार

Last Updated:

Mumbai Railways Block : मुंबई सेंट्रलवरील फलाट क्रमांक 4 चे रुळ नूतनीकरण करण्यासाठी पश्चिम रेल्वेनं 60 दिवसांचा ब्लॉक जाहीर केला आहे. याचा काळात रेल्वेचे वेळापत्रक कसे असेल याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

News18
News18
मुंबई : रेल्वे प्रवशांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पश्चिम रेल्वेकडून मुंबई सेंट्रल स्थानकावर महत्त्वाचे काम हाती घेण्यात आले आहे. फलाट क्रमांक 4 वरच्या रेल्वे रुळांचे मोठ्या प्रमाणावर काम करण्यात येत असल्याने तब्बल 60 दिवसांचा विशेष ब्लॉक सुरू करण्यात आला आहे. या काळात अनेक गाड्यांच्या थांब्यांमध्ये बदल केले जात आहेत.
मुंबई सेंट्रलऐवजी 'या' स्थानकावर थांबणार महत्त्वाच्या गाड्या
या ब्लॉकमुळे काही महत्त्वाच्या दूर पल्ल्याच्या गाड्या मुंबई सेंट्रलऐवजी दादर स्थानकावरच थांबवल्या जाणार आहेत. यामध्ये (22946) ओखा–मुंबई सेंट्रल, (22210) हजरत निजामुद्दीन–मुंबई सेंट्रल, (09086) इंदूर–मुंबई सेंट्रल, (09076) काठगोदाम–मुंबई सेंट्रल आणि (09186) कानपूर अनवरगंज–मुंबई सेंट्रल या गाड्यांचा समावेश आहे. या सर्व गाड्या आता पुढील आदेश येईपर्यंत दादर स्टेशनवरच थांबतील.
advertisement
दररोज लोकल ट्रेन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकल ट्रेनच्या फेऱ्यांवर या ब्लॉकचा अजिबात परिणाम होणार नाही. लोकल सेवा पूर्ववत सुरू राहणार आहेत. त्यामुळे दैनंदिन प्रवाशांना अतिरिक्त त्रास होणार नाही अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे.
दूर पल्ल्याच्या गाड्यांमध्ये बदल झाल्यामुळे मेल आणि एक्सप्रेस गाड्यांचा परतीचा प्रवासही दादर स्थानकावरूनच सुरू होणार आहे. त्यामुळे जे प्रवासी मुंबई सेंट्रलवरून गाडीत चढायचे नियोजन करत होते, त्यांनी आता दादर स्थानकावरच पोहोचण्याची काळजी घ्यावी.
advertisement
पश्चिम रेल्वेने सर्व प्रवाशांना आवाहन केले आहे की प्रवास सुरू करण्यापूर्वी आपल्या गाडीची नवीन वेळ, थांबा आणि मार्ग याची खात्री करून मगच प्रवास करावा. अधिकृत रेल्वे वेबसाइट, अॅप किंवा हेल्पलाईनवरून अद्ययावत माहिती सहज मिळू शकते.
मोठ्या प्रमाणावरील दुरुस्ती कामामुळे पुढील काही दिवस गाड्यांचे वेळापत्रक आणि थांबे बदलत राहू शकतात. त्यामुळे प्रवाशांनी सतर्क राहून नियोजन करणे महत्त्वाचे आहे. रेल्वे प्रशासनानेही सर्व सुविधांची काळजी घेत काम वेळेत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
मोठी बातमी! पश्चिम रेल्वेचा 60 दिवसांचा ब्लॉक जाहीर; वेळापत्रक पूर्णपणे बदलणार
Next Article
advertisement
Beed : 'ते' अमरसिंह पंडितांना संपवायलाच आले होते, जखमी झालेल्या पीएनं ICU तून सगळंच सांगितलं
'ते' अमरसिंह पंडितांना संपवायलाच आले होते, जखमी पीएनं ICU तून सगळंच सांगितलं
  • 'ते' अमरसिंह पंडितांना संपवायलाच आले होते, जखमी पीएनं ICU तून सगळंच सांगितलं

  • 'ते' अमरसिंह पंडितांना संपवायलाच आले होते, जखमी पीएनं ICU तून सगळंच सांगितलं

  • 'ते' अमरसिंह पंडितांना संपवायलाच आले होते, जखमी पीएनं ICU तून सगळंच सांगितलं

View All
advertisement