Pune Crime : एक दोन नव्हे 400... निलेश घायवळ गँगच्या शार्प शुटरच्या घरावर रेड टाकली अन् पोलीसही चक्रावले! इलेक्शनपूर्वी मोठा डाव?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Pune Gang war : निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ हा जिल्हा परिषद निवडणूक लढणार होता. त्यासाठी ही काडतुसं आणण्यात आली होती का? असा प्रश्न विचारला जात होता.
Pune Nilesh Ghaiwal Gang : पुण्यातून कुख्यात गँगस्टर निलेश घायवळ टोळी संदर्भात एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. या टोळीचा मुख्य हस्तक आणि 'नंबरकारी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका आरोपीच्या घरावर पोलिसांनी झडती घेतली. या कारवाईत पोलिसांच्या हाती मोठं घबाड लागले असून, अवैध शस्त्रास्त्रांच्या वापरावर यामुळे पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या कारवाईत पुणे पोलिसांसमोर काही नवे खुलासे झाले आहेत.
निलेश घायवळ टोळीचा 'नंबरकारी'
या प्रकरणात बटव्या चौधरी याच्यासह अजय सरोदे याला कोथरूड पोलिसांनी तीन दिवसांपूर्वी कर्नाटक राज्यातील गाणगापूर येथून अटक केली. अजय सरोदे हा निलेश घायवळ टोळीचा 'नंबरकारी' म्हणून कार्यरत होता. आरोपी अजय सरोदे याच्या कसून चौकशीनंतर पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेण्याचा निर्णय घेतला. या झडतीमध्ये पोलिसांना चक्क 400 काडतूस आढळले, ज्यामुळे पोलीसही चक्रावून गेले. यात 200 जिवंत काडतूस आणि अन्य 200 रिकाम्या पुंगळ्या पोलिसांना सापडल्या आहेत.
advertisement
जिल्हा परिषद निवडणूकीपुर्वी मोठा डाव?
पोलीस रेकॉर्डनुसार, अजय सरोदे हा 17 सप्टेंबर रोजी कोथरूड भागात झालेल्या गोळीबाराच्या घटनेत घटनास्थळी उपस्थित होता आणि तो त्या गुन्ह्यात आरोपी होता. या टोळीने एका व्यक्तीवर गोळीबार केला होता. विशेष म्हणजे, इतका गंभीर गुन्हा दाखल असतानाही, अजय सरोदे याच्याकडे पिस्तुलाचा परवाना असल्याचे समोर आले आहे. निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ हा जिल्हा परिषद निवडणूक लढणार होता. त्यासाठी ही काडतुसं आणण्यात आली होती का? असा प्रश्न विचारला जात होता.
advertisement
29 जानेवारी 2024 रोजी परवाना दिला
दरम्यान, धक्कादायक बाब म्हणजे पुणे पोलिसांनी त्याला 29 जानेवारी 2024 रोजी हा परवाना दिला होता, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. एका सक्रिय गुन्हेगारी टोळीच्या सदस्याकडे परवाना कसा आला, यावर आता गंभीर चर्चा सुरू झाली आहे. या संपूर्ण प्रकरणाची पुणे पोलीस कसून चौकशी करत आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 03, 2025 9:24 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime : एक दोन नव्हे 400... निलेश घायवळ गँगच्या शार्प शुटरच्या घरावर रेड टाकली अन् पोलीसही चक्रावले! इलेक्शनपूर्वी मोठा डाव?


