Ankita Walawalkar : 'तेव्हा सूरज हवा...' प्राजक्ता गायकवाडच्या लग्नात हजेरी लावताच अंकिता वालावलकर ट्रोल
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Ankita Walawalkar : कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरने नुकतीच अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडच्या लग्नाला हजेरी लावील होती. लग्नातील व्हिडीओ समोर आल्यानंतर अंकिता सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे.
कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर नेहमीच चर्चेत असते. अंकिता सध्या नागपूरमध्ये होती. कुटुंबातील जवळच्या व्यक्तीच्या लग्नासाठी ती नागपूरला गेली होती. नागपूरहून परत आल्यानंतर अंकिता वालावलकर थेट अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडच्या लग्नात दिसली. अंकिताने नुकतीच प्राजक्ता गायकवाडच्या लग्नात हजेरी लावली होती. लग्नातील तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
अंकिता वालावलकर प्राजक्ताला लग्नासाठी पुण्याला गेली होती. अंकिताने प्राजक्ताला खास आहेर दिला. स्टेजवर जाताच दोघींनी एकमेकींना घट्ट मिठी मारली. प्राजक्ताने नवरा शंभुराजशी अंकिताशी ओळख करून दिली.
आहेर दिल्यानंतर अंकिताने प्राजक्ताचं कौतुक केलं. अंकिता प्राजक्ताच्या नवऱ्याला म्हणाली, तशा आम्ही मुली खूप छान आहोत. जास्त काही करण्याची गरज नाही. आमचं फक्त थोडसं ऐका, आम्ही नेहमीच बरोबर असतो. ती नेहमी बरोबर असते. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
advertisement
advertisement
अंकिताचा प्राजक्ता गायकवाडच्या लग्नातील व्हिडीओ पाहून चाहत्यांनी सूरज चव्हाणच्या लग्नावरून कमेंट्स करत तिला ट्रोल केलं आहे. एका युझरनं लिहिलंय, "हिच्या लग्नाला कशी काय आली आणी सूरज च्या लग्नाला का बर आली नाही केळवण वगैरे केल दागिने वगैरे पसंद केल आणी लग्नाला का बर नाही आली". दुसऱ्या युझरने लिहिलंय, "सूरजच्या लग्नाला नाही गेली प्राजक्ताच्या लग्नाला गेली." आणखी एका युझरनं लिहिलंय, "कंटेंट हवा असला की सुरज हवा... जिकडं भेळ तिकडे खेळं"
advertisement

सूरज चव्हाणचं नुकतंच लग्न झालं. सूरजने त्याच्या मामाची मुलगी संजना गोफणे हिच्याबरोबर लग्न केलं. सूरजच्या लग्नात बिग बॉस मराठी 5 ची किलर गर्ल जान्हवी किल्लेकर हिनं हजेरी लावली होती. पुरुषोत्तमदादा पाटील, डीपी दादानेही हजेरी लावली होती. सूरजच्या लग्नाला गैरहजर राहिलेली अंकिता मात्र अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडच्या लग्नाला हजेरी लावताना दिसली.
advertisement

अंकिताने सूरजच्या लग्नाची सगळी शॉपिंग करून दिली. त्याचं केळवणही केलं पण त्याच्या लग्नाला मात्र ती गेली नाही. तिच्या नातेवाईकांचं लग्न असल्याने ती नागपूरला गेली होती. अंकिताने याआधीच ती सूरजच्या लग्नाला जाणार नसल्याचं सांगितलं होत. दरम्यान अंकिताचा प्राजक्ता गायकवाडच्या लग्नातील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 03, 2025 11:24 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Ankita Walawalkar : 'तेव्हा सूरज हवा...' प्राजक्ता गायकवाडच्या लग्नात हजेरी लावताच अंकिता वालावलकर ट्रोल


