Shani 2026: सुरुवातीचे सहा महिने बेक्कार हालत! मार्गी शनिचा प्रकोप 4 राशीच्या लोकांना रडवणार

Last Updated:
Shani Astrology: ज्योतिषशास्त्रात शनिच्या स्थितीला विशेष महत्त्व आहे. वर्ष 2025 मध्ये शनिच्या स्थितीत वेळोवेळी बदल झाले. गेल्याच महिन्यात दिनांक 28 नोव्हेंबर रोजी शनी मार्गी झालाय. ज्योतिषशास्त्रात मार्गी होण्याला शनिची सरळ चाल असं म्हटलं जातं. सरळ मार्गी झालेला शनी अधिक शक्तिशाली आणि कडक परिणाम दाखवणारा मानला जातो.
1/5
आता पुढे 26 जुलै 2026 पर्यंत शनी सरळ मार्गी राहणार आहे. मीन राशीतून तो लोकांना त्यांच्या कर्मांच्या आधारे शुभ आणि अशुभ परिणाम दाखवेल. ज्योतिष तज्ज्ञांच्या मते शनीदेव 2026 च्या नवीन वर्षात चार राशींच्या कर्मांचे मोजमाप करेल. म्हणजे 2026 च्या साधारणपणे पहिल्या सहा महिन्यांमध्ये काही राशींना खडतर काळ पाहावा लागू शकतो. या राशींविषयी जाणून घेऊ.

advertisement
2/5
मेष - विविध गोष्टी अशा पद्धतीनं घडू लागतील की, त्यानं मेष राशीच्या लोकांची चिंता वाढू शकते. तुमची बदनामी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बदनामी फार वाईट प्रकारची असू शकते. कोणत्याही कामात सतत अडचणी उद्भवू शकतात. तुमच्या जवळच्या व्यक्तीची प्रतिमा खराब होऊ शकते. तुम्हाला तुमची सामाजिक प्रतिष्ठा राखण्यासाठी खूप संघर्ष करावा लागू शकतो. काम-व्यवसायात देखील तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागेल.

3/5
सिंह - शनिची अडीचकी सिंह राशीवर असल्यानं काळजी घ्या. शनी वक्री होता तेव्हा बरं चाललेलं पण आता अचानक परिस्थिती तापाची होऊ शकते. आता अडीचकी पूर्ण ताकदीने सुरू होईल. हा अडचणींचा काळ असेल, धोते पत्करू नका. तुम्हाला तुमच्या आरोग्य आणि करिअरबाबत सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता असेल. आजारांना हलक्यात घेऊ नका, काही शंका असल्यास टेस्ट करून घ्या. तुमच्या नोकरी आणि व्यवसायात प्रगती करण्यासाठी तुम्हाला खूप प्रयत्न करावे लागतील. षड्यंत्र करणारे तुमच्या प्रगतीत अडथळा आणू शकतात.

4/5
कुंभ - शनिची साडेसाती कुंभ राशीवर सुरू आहे. शेवटचा टप्पा असल्यानं हलगर्जीपणा चालणार नाही. साडेसातीचा परिणाम आता आणखी तीव्र होईल. पैसे मिळवण्यासाठी कुंभ राशीच्या राशीच्या लोकांना खूप कष्ट करावे लागतील. आपल्याला पैसे कुठेतरी अडकण्याचा धोका आहे. आरोग्य आणि मानसिक समस्या वाढू शकतात. अनावश्यक नैराश्य, ताण किंवा कंटाळवाणेपणा जाणवू शकतो. हाडे आणि नसांचे त्रास तुमच्यासाठी चिंतेचा विषय असू शकतात.

5/5
मीन - शनिची साडेसाती मीन राशीला सुरू आहे. दुसरा खडतर टप्पा या राशीच्या लोकांवर सुरू आहे, त्यामुळे ताकसुद्धा फुंकून प्यावे अशी स्थिती आहे. शनी सरळ मार्गी असल्यानं अधिक परिणाम दाखवेल. करिअर आणि आर्थिक समस्या तुम्हाला त्रास देतील. करिअरमधील चुकीचे निर्णय तुम्हाला अडचणीत आणू शकतात. नोकरी, व्यवसाय आणि आर्थिक बाबतीत तुम्हाला सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. कोणतेही मोठे निर्णय घ्यायचे असतील, कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी तुमच्या हितचिंतकांचा किंवा ज्योतिष तज्ज्ञांचा सल्ला घ्या.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

Pannalal Surana : राज्याच्या सामाजिक-राजकीय स्थित्यंतराचा साक्षीदार हरपला, ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा यांचे निधन
सामाजिक-राजकीय स्थित्यंतराचा साक्षीदार हरपला, ज्येष्ठ नेते पन्नालाल सुराणा कालवश
  • समाजवादी चळवळीचा आधारवड हरपला! ज्येष्ठ नेते पन्नालाल सुराणा यांचे निधन

View All
advertisement