Katraj-Swargate Metro: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! स्वारगेट ते कात्रज प्रवास आता जलद; मेट्रोबाबत महत्त्वाची अपडेट
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
महामेट्रो या भूमिगत मार्गिकेच्या कामाला तातडीने सुरुवात करणार आहे. या मार्गामुळे कात्रज, भारती विद्यापीठ, धनकवडीसह परिसरातील लाखो नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचा मोठा आणि जलद पर्याय उपलब्ध होणार आहे.
पुणे : पुणेकरांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. स्वारगेट ते कात्रज या महत्त्वाकांक्षी भूमिगत मेट्रो मार्गाचे काम सुरू करण्यासाठी अखेर निवडणूक आयोगाने मंजुरी दिली आहे. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या या मार्गाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे.
स्वारगेट-कात्रज मेट्रो मार्गाचे भूमिपूजन २९ सप्टेंबर २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. मात्र, त्यानंतर या मार्गाचे काम त्वरित सुरू होऊ शकले नाही. याला कारण होते, स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी मेट्रो स्थानके वाढवण्याची केलेली मागणी. या मार्गावर बिबवेवाडी (स्वामी विवेकानंद पुतळा) आणि बालाजीनगर ही दोन स्थानके समाविष्ट करण्याची मागणी नागरिकांनी केली. नागरिकांच्या मागणीचा विचार करून राज्य सरकारने मूळ आराखड्यात बदल करण्यास परवानगी दिली होती. त्यानुसार, पूर्वीच्या तीनऐवजी आता पाच मेट्रो स्थानके (स्टेशन्स) उभारण्यास मंजुरी मिळाली.
advertisement
आराखड्यात बदल करण्याच्या या प्रक्रियेत मेट्रो मार्गाचे काम सुरू होण्यास विलंब झाला. महामेट्रोने (MahaMetro) या मार्गासाठी निविदा प्रक्रिया राबवली. ज्यात अदानी समूहाच्या आयटीडी सिमेंटेशन कंपनीची निविदा सर्वात कमी रकमेची ठरली. त्यांना हे काम मिळाल्यानंतर तांत्रिक अडचणी आणि आवश्यक परवानग्यांची प्रक्रिया पूर्ण झाली. आता आयोगाची अंतिम मंजुरी मिळाल्याने, महामेट्रो या भूमिगत मार्गिकेच्या कामाला तातडीने सुरुवात करणार आहे. या मार्गामुळे कात्रज, भारती विद्यापीठ, धनकवडीसह परिसरातील लाखो नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचा मोठा आणि जलद पर्याय उपलब्ध होणार आहे.
advertisement
इतका खर्च येणार
स्वारगेट - कात्रज मार्गासाठी एकूण सुमारे ३ हजार ५०० कोटी रुपये खर्च होणार आहे
या मार्गावर मार्केटयार्ड, बिबवेवाडी (विवेकानंद पुतळा), बालाजीनगर (धनकवडी), भारती विद्यापीठ आणि कात्रज ही स्थानके असतील
जमिनीपासून १२ ते २८ मीटर खोलवर भूमिगत मेट्रोचे काम होईल
मार्चच्या पहिल्या आठवड्यात ‘टनेल बोअरिंग मशिनद्वारे काम सुरू होईल
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 03, 2025 7:31 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Katraj-Swargate Metro: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! स्वारगेट ते कात्रज प्रवास आता जलद; मेट्रोबाबत महत्त्वाची अपडेट


