Success Story : शेतकऱ्यानं चालवलं डोकं, शेतीला जोडधंदा म्हणून निवडला दूध व्यवसाय, महिन्याला 1 लाख कमाई

Last Updated:

अनेक शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसायाकडे वळत आहेत. बाळासाहेब काकडे हे गेल्या दोन वर्षांपासून शेतात गायपालन करत आहेत.

+
News18

News18

छत्रपती संभाजीनगर : अनेक शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसायाकडे वळत आहेत. शेंद्रा येथील बाळासाहेब काकडे हे गेल्या दोन वर्षांपासून कुंभेफळ येथे त्यांच्या शेतात गायपालन करत आहेत. काकडे यांच्याकडे लहान मोठ्या 23 गाई आहेत. या गाईंच्या माध्यमातून दिवसाला जवळपास 130 लिटर दूध काढले जाते. तसेच त्या दुधाची विक्री दूध डेअरीला केली जाते. दूध विक्रीतून काकडे यांची महिन्याला 1 लाख 40 हजार रुपयांची उलाढाल होते तर सर्व खर्च वजा करून 1 लाख रुपये कमाई होत असल्याचे बाळासाहेब काकडे यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.
छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील कुंभेफळ येथे बाळासाहेब काकडे यांनी 2023 मध्ये गाय पालनाचा व्यवसाय सुरू केला. आधीपासूनच गाईंची आवड असल्यामुळे गाय पालनावर विचार केला, इतर व्यवसायांमध्ये नियोजन लागत नव्हते तसेच शेतकरी कुटुंबातील आहे त्यामुळे गाय पालनाचा निर्धार केला. सुरुवातीला 5 गाई आणल्या. सहा महिन्यांमध्ये गाय पालन नियोजन आमचे पक्के झाले. त्यानंतर आणखी काही गाईंची त्यामध्ये वाढ केली आणि सध्याच्या परिस्थितीत 23 गाई असल्याचे काकडे सांगतात.
advertisement
गाईंचे संगोपन आणि पालन आणि शेण काढणे, गाईंना चारा-पाणी करणे, दूध काढणे आणि गोठ्याची स्वच्छता करणे हे सर्व कामे काकडे स्वतः करतात त्यामुळे त्यांना अधिक नफा मिळतो. गायपालन करत असताना गाईंच्या आरोग्याची काळजी हा घटक खूप महत्त्वाचा आहे. तसेच गाईंना खाण्यासाठी चाऱ्याचे नियोजन करणे महत्त्वाचे आहे. तसेच नवीन तरुणांनी गाय पालनाच्या व्यवसायात इतरांचे व्हिडिओ किंवा नफा पाहून येऊ नये, स्वतःची कष्ट करण्याची तयारी असेल तर नक्की गाय पालनामध्ये आपले पाऊल ठेवणे महत्त्वाचे आणि फायद्याचे आहे.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
Success Story : शेतकऱ्यानं चालवलं डोकं, शेतीला जोडधंदा म्हणून निवडला दूध व्यवसाय, महिन्याला 1 लाख कमाई
Next Article
advertisement
Gold Price Prediction : नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा धक्कादायक अंदाज
नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध
  • नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध

  • नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध

  • नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध

View All
advertisement