Local Body Election Vote Couting: हायकोर्टाने उद्याची मतमोजणी पुढे ढकलली, निवडणूक आयोगाकडून समोर आली मोठी अपडेट
- Reported by:UDAY JADHAV
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
Election Commission Local Body Election Vote Counting: आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मतमोजणी २१ डिसेंबर रोजी करण्याचे आदेश दिले. या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोगाकडून मोठी अपडेट समोर आली आहे.
मुंबई: आज होत असलेल्या नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीची मतमोजणी उद्या, बुधवारी ३ डिसेंबर रोजी निवडणूक आयोगाने जाहीर केली होती. त्यानंतर आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मतमोजणी २१ डिसेंबर रोजी करण्याचे आदेश दिले. या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोगाकडून मोठी अपडेट समोर आली आहे.
दोन दिवसापूर्वी निवडणूक आयोगाने राज्यातील काही नरगपरिषदा आणि नगर पंचायतीच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत, त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय न्यायालयाने दिला. निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर केल्यापासून अगदी मतदार यादीपासून प्रभागात दिलेल्या आरक्षणापर्यंत अनेक प्रकारचे घोळ समोर आले आहेत. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठात वेगवेगळ्या याचिका दाखल झाल्या आहेत. काही नगर परिषद, नगर पंचायतीच्या निवडणुका आणि काही प्रभागातील मतदान हे २० डिसेंबर रोजी होणार आहे. हा मुद्दा लक्षात घेऊन हायकोर्टाने एकाच दिवशी मतमोजणी करण्याचे आदेश दिले.
advertisement
निवडणूक आयोगाने काय म्हटले?
राज्य निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यायालयाच्या लेखी आदेशात नेमके कोणते निर्देश आहेत, कोणत्या मुद्द्यांवर स्पष्टता दिली आहे आणि काय अटी घालण्यात आल्या आहेत याचा सविस्तर अभ्यास आयोग करणार आहे. लेखी आदेशात सांगितल्याप्रमाणे पुढची सर्व प्रक्रिया पार पडणार आहे. न्यायालयानं त्यांच्या आदेशात नेमकं काय म्हटले आहे याचा अभ्यास राज्य निवडणूक करणार आहे. आता लेखी आदेशानंतर मतमोजणीबाबत आदेशावर पुढील निर्णय राज्य निवडणूक आयोग घेणार आहे.
advertisement
निवडणूक मतमोजणी पुढे का ढकलली?
काही नगर परिषदांबाबत न्यायालयीन प्रक्रिया प्रलंबित आहेत. त्यामुळे राज्यातील सर्व नगरपालिका, नगर परिषद निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी जाहीर व्हावेत. आधीच निकाल जाहीर झाल्यास नंतर, २० डिसेंबर रोजी होणाऱ्या २४ नगर परिषदांच्या मतदानावर आणि निकालावर त्याचा प्रभाव पडू शकतो, असा युक्तीवाद दाखल याचिकांमध्ये करण्यात आला होता. त्यानंतर नागपूर खंडपीठाने ३ डिसेंबर रोजीची मतमोजणी आता २१ डिसेंबर रोजी घेण्याचे जाहीर केले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 02, 2025 2:27 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Local Body Election Vote Couting: हायकोर्टाने उद्याची मतमोजणी पुढे ढकलली, निवडणूक आयोगाकडून समोर आली मोठी अपडेट









