Bollywood Song : 'लगान' चित्रपट 15 जून 2001 मध्ये रिलीज झाला होता. त्यात ब्रिटिश राजवटीतील भारत कसा होता, ते भारतावर कसा कर आकारायचे त्याचे चित्रण या चित्रपटात दाखवले होते. या चित्रपटात खूप कलाकारांनी काम केले होते. त्यातील आमिर खानने मुख्य भूमिका केली होती. या चित्रपटातील 'मितवा' गाणं खूपच लोकप्रिय झाले होते. यात आमिर गावकऱ्यांना धीर आणि एक जोश देताना दाखवले आहे. हे गाणं अल्का याग्निक, उदित नारायण, सुखविंदर सिंग आणि श्रीनिवास यांनी गायले आहे. तर या गाण्याला संगीत ए.आर.रेहमान यांनी संगीत दिले आहे. तर या गाण्याचे बोल जावेद अख्तर यांचे आहेत. हा चित्रपट खूपच गाजला होता. चित्रपट ऑस्करच्या शर्यतीतही होता.
Last Updated: December 03, 2025, 07:31 IST