डॉ. गौरी मृत्यूप्रकरणात मोठा खुलासा, अनंत गर्जेची गर्लफ्रेंड आली समोर, म्हणाली, "2022 पासून त्याच्याशी..."
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
अनंत गर्जे याच्या प्रेयसीनं अखेर वरळी पोलीस ठाण्यात जबाब नोंदवला असून गौरीला घरात सापडलेल्या गर्भपात कागदपत्रांबाबत तिने खुलासा केला आहे.
भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या डॉक्टर पत्नी गौरी गर्जे पालवे यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईतील वरळी इथं आपल्या राहत्या घराच आयुष्याचा शेवट केला होता. एका राजकीय नेत्याशी कनेक्शन असलेल्या व्यक्तीच्या उच्च शिक्षित पत्नीने अशाप्रकारे आत्महत्या केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. अनंत गर्जे याचे बाहेर एका मुलीसोबत प्रेमसंबंध सुरू आहेत, याच कारणातून वाद झाल्यानंतर गौरीने टोकाचं पाऊल उचललं असा दावा केला जात आहे.
गौरीला अनंत गर्जेचे काही कागदपत्रं सापडले होते. ही कागदपत्रं एका तरुणीच्या गर्भपाताची होती, ज्यात पतीच्या नावासमोर अनंत गर्जेचं नाव होतं. याच कारणातून अनंत आणि गौरीमध्ये वादाचे खटके उडत होतं. घटनेच्या दिवशी देखील याच कारणातून दोघांमध्ये वाद झाल्याचं सांगितलं जात. हा वाद विकोपाला गेल्यानंतर गौरीने गळफास लावून आत्महत्या केली.
पण आता या प्रकरणात मोठा खुलासा समोर आला आहे. अनंत गर्जे याच्या प्रेयसीनं अखेर वरळी पोलीस ठाण्यात जबाब नोंदवला असून गौरीला घरात सापडलेल्या गर्भपात कागदपत्रांबाबत तिने खुलासा केला आहे. २०२२ पासून माझा आणि अनंतचा कोणताही संबंध नाही, असं तिने जबाबात म्हटलं आहे. अनंतच्या प्रेयसीचा जबाब समोर आल्याने आता या प्रकरणाला नवं वळण मिळालं असून गौरीच्या आत्महत्येबाबत विविध प्रश्न निर्माण होत आहेत.
advertisement
दरम्यान, पोलिसांनी संशयित अनंत गर्जेची मानसशास्त्रीय तपासणी (पॉलिग्राफ टेस्ट) करण्याची मागणी कोर्टाकडे केली आहे, जी वैज्ञानिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आहे. न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, गौरीचा मृतदेह आढळल्यावर अनंतने खिडकीतून फ्लॅटमध्ये प्रवेश केला होता. या वेळी त्याच्या शरीरावर किरकोळ जखमा झाल्याची माहिती आहे. या घटनेचा सविस्तर तपास पोलीस करत आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 03, 2025 7:48 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
डॉ. गौरी मृत्यूप्रकरणात मोठा खुलासा, अनंत गर्जेची गर्लफ्रेंड आली समोर, म्हणाली, "2022 पासून त्याच्याशी..."


