Weather Alert: उत्तरेकडून आलंय संकट! पुणे, सोलापूरला ‘कोल्ड वेव्ह’चा अलर्ट, 24 तास धोक्याचे!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
Weather Alert: उत्तर भारतातून येणाऱ्या शीतलहरींमुळे पश्चिम महाराष्ट्रात पारा घसरला आहे. मंगळवारी सोलापूर आणि पुणे जिल्ह्याला कोल्ड वेव्हचा इशारा देण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरातील 'डिटवाह' चक्रीवादळ निवळून गेले. अशातच उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह धडकत असल्याने मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट कायम आहे. आज 2 डिसेंबर रोजी राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह हुडहुडी कायम राहण्याचा अंदाज आहे. तर मध्य महाराष्ट्रात थंडीच्या लाटेची शक्यता असल्याने सतर्कतेचा यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.
advertisement
आज मंगळवारी पुणे येथे कोल्ड वेव्हचा इशारा देण्यात आला आहे. तर पुण्यातील किमान तापमान 10 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येईल. यामुळे पुणेकरांना असामान्य गारठा जाणवेल. तेथील कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 10 अंश सेल्सिअस इतके राहील. पुणे घाटमाथा परिसरात देखील शीत लहरींचा अंदाज असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात थंडीची लाट येण्याची शक्यता असल्याने सतर्कतेचा यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित जिल्ह्यांत गारठा कायम राहून पहाटे धुक्यासह दव तर दिवसभरच्या वातावरणात थंडी राहील. तसेच राज्यातील काही ठिकाणी पारा 10 अंशाच्या खाली घसरल्याने हुडहुडी वाढली आहे. यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी.


