बारामती नव्हे तर या देशात होणार जय पवारांचं डेस्टिनेशन वेडिंग, अजितदादांचं राष्ट्रवादीच्या फक्त 2 नेत्यांना आमंत्रण
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Jay Pawar and Rutuja Patil Destination Wedding: उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनेत्रा पवार यांचा मुलगा जय पवार यांचा शाही विवाहसोहळा येत्या आठवड्यात पार पडणार आहे.
Jay Pawar and Rutuja Patil Destination Wedding: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनेत्रा पवार यांचा मुलगा जय पवार यांचा शाही विवाहसोहळा येत्या आठवड्यात पार पडणार आहे. जय पवार यांचा विवाह ऋतुजा पाटील यांच्यासोबत होत असून, हा विवाह सोहळा ४, ५ आणि ७ डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या लग्नाला केवळ ४०० पाहुणे उपस्थित राहणार असून अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या केवळ दोनच नेत्यांना आमंत्रण दिलं आहे.
चार दिवस पारंपरिक पद्धतीने होणार विवाह
पवार-पाटील कुटुंबीयांकडून या विवाह सोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. विवाह सोहळ्याचे संपूर्ण कार्यक्रम चार दिवसांचे असून, यात पारंपरिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ४ डिसेंबरला मेहेंदळी समारंभ, ५ डिसेंबरला संगीत, तर ६ डिसेंबरला हळदी, वरात आणि मुख्य लग्नसोहळा होणार आहे. ७ डिसेंबरला स्वागत समारंभ पार पडणार आहे.
advertisement
हा पवार कुटुंबीयांचा मोठा सोहळा असला तरी निमंत्रितांची संख्या अत्यंत मर्यादित ठेवण्यात आली आहे. बहरीनमध्ये होणाऱ्या या विवाह समारंभासाठी पवार आणि पाटील कुटुंबीयांकडून केवळ ४०० पाहुण्यांनाच निमंत्रण देण्यात आले आहे.
राष्ट्रवादीच्या फक्त दोन नेत्यांना आमंत्रण
विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून (अजित पवार गट) फक्त दोनच नेत्यांना या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. यात पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा समावेश आहे. कुटुंबातील अत्यंत जवळच्या व्यक्ती आणि निवडक पाहुण्यांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा परदेशात पार पडणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 03, 2025 11:38 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
बारामती नव्हे तर या देशात होणार जय पवारांचं डेस्टिनेशन वेडिंग, अजितदादांचं राष्ट्रवादीच्या फक्त 2 नेत्यांना आमंत्रण










