दणक्यात उडवला लग्नाचा बार, घरी येऊन बाशिंगही काढलं नाही तोच सूरज-संजनाची अशी अवस्था, नवरा-नवरीचा VIDEO
- Published by:Minal Gurav
Last Updated:
सूरजच्या बहिणींनी मोठ्या प्रेमानं संजनाचं सूरजच्या नव्या घरात स्वागत केलं. नवरीचा घरात गृहप्रवेश झाला पण त्यानंतर जे झालं त्याचा व्हिडीओ तुम्हीच पाहा.
बिग बॉस मराठी सीझन पाचचा विजेता सूरज चव्हाण नुकताच लग्नबंधनात अडकला. 29 नोव्हेंबरला सासवड येथे सूरज चव्हाणचं लग्न झालं. सूरजने त्याची मामाची मुलगी संजना गोफणे हिच्याशी लग्न केलं. सूरज आणि संजना यांचं लग्न मोठ्या धुम धडाक्यात करण्यात आलं. सेलिब्रेटींसारखा भव्य भाट दोघांच्या लग्नात पाहायला मिळाला. लग्न तर दणक्यात झालं पण रात्री घरी गेल्यानंतर सूरज आणि संजनाची अशी अवस्था झाली की... दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
सूरज आणि संजना यांच्या लग्नाआधीच्या सगळ्या विधी मोठ्या थाटात पार पडल्या. त्याचा साखरपुडा, हळद आणि लग्न एकाच दिवशी होतं. त्यामुळे सगळ्यांचीच चांगलीच धांदळ उडाली. पण संपूर्ण विवाहसोहळा निर्विघ्न पार पडला.
advertisement
सूरज चव्हाणच्या लग्नाला चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. लग्नाला अनेक सेलिब्रेटींना आमंत्रण देण्यात आलं होतं मात्र नियोजित कार्यक्रमामुळे अनेक कलाकार येऊ शकले नाहीत. सूरजच्या लग्नात झालेली गर्दी आवाक्यात आणण्यासाठी बाऊन्सर्स मागवण्यात आले होते. संपूर्ण हॉलमध्ये बाऊन्सर्स तौनात होते. मात्र तरीही सूरज आणि संजनाचे फोटो क्लिक करण्यासाठी चाहत्यांनी स्टेजच्या भोवती गर्दी केली होती.
advertisement
मोठ्या थाटामाटत लग्न झालं. लग्न झाल्यानंतर सूरज आणि संजना घरी परतले. सूरजच्या नव्या घरात संजनाने अखेर गृहप्रवेश केला. सूरजच्या बहिणींनी मोठ्या प्रेमानं संजनाचं घरात स्वागत केलं. नवरीचा घरात गृहप्रवेश झाला पण त्यानंतर जे झालं त्याचा व्हिडीओ तुम्हीच पाहा.
advertisement
सूरज आणि संजना यांचा व्हिडीओ समोर आला आहे ज्यात दोघेही नवरा नवरीच्या गेटअपमध्ये शेकोटी जवळ बसले आहेत. बारामतीमध्ये सध्या प्रचंड थंडी आहे. बारामतीच्या थंडीत नवरा नवरी झालेले सूरज आणि संजना गारठले. संपूर्ण फॅमिली शेकोटी करायला बसले. सूरज आणि संजना यांनी कपाळावरचं बाशिंग देखील काढलं नव्हतं. सूरजचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 01, 2025 5:01 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
दणक्यात उडवला लग्नाचा बार, घरी येऊन बाशिंगही काढलं नाही तोच सूरज-संजनाची अशी अवस्था, नवरा-नवरीचा VIDEO


