Pune Election : '...नाहीतर तुझा संतोष देशमुख करू', फुरसुंगी नगरपरिषदेच्या उमेदवारास गाडी अडवून धमकी! नेमकं काय घडलं? पाहा
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Pune Fursungi Nagarparishad Election : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बनसोडे हे सोमवारी सकाळी अंदाजे 8:30 वाजण्याच्या सुमारास सासवड रोड रेल्वे स्टेशनवरून भोसले व्हिलेजकडे आपल्या कारमधून येत होते.
Fursungi Election AAP Candidate threaten : पुणे जिल्ह्यातील फुरसुंगी नगरपरिषदेच्या पहिल्याच निवडणुकीत तणाव वाढल्याचे चित्र आहे. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या एका प्रमुख उमेदवाराला रस्त्यात अडवून गंभीर धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे निवडणुकीच्या वातावरणात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला असून तपास सुरू करण्यात आला आहे. निवडणुकीतून माघार घे नाहीतर तुझा संतोष देशमुख करू, अशी धमकी उमेदवाराला देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. आम आदमी पक्षाचे यशवंत अरुण बनसोडे असं या उमेदवाराचं नाव आहे.
फुरसुंगी नगरपरिषदेसाठी पहिलीच निवडणूक
फुरसुंगी नगरपरिषदेसाठी होणारी ही पहिलीच निवडणूक असल्यामुळे शहराचे लक्ष याकडे लागले आहे. नगराध्यक्षपदासाठी एकूण 7 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. यात राष्ट्रवादी (अजित पवार गट), राष्ट्रवादी (शरद पवार गट), शिंदे शिवसेना, ठाकरे शिवसेना आणि आम आदमी पक्षाचे (AAP) प्रमुख उमेदवार रिंगणात आहेत. भाजपने या जागेसाठी उमेदवार दिलेला नाही, तर 2 अपक्ष उमेदवारही निवडणूक लढवत आहेत.
advertisement
निवडणुकीतून माघार घे, नाहीतर तुझा संतोष देशमुख करू
यापैकी, आम आदमी पक्षाचे यशवंत अरुण बनसोडे हे भोसले व्हिलेज, फुरसुंगी येथील रहिवासी आहेत, ते नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बनसोडे हे सोमवारी सकाळी अंदाजे 8:30 वाजण्याच्या सुमारास सासवड रोड रेल्वे स्टेशनवरून भोसले व्हिलेजकडे आपल्या कारमधून येत होते. याचवेळी एका व्यक्तीने त्यांची कार अडवली. बनसोडे यांनी कारची काच खाली केल्यानंतर, त्या व्यक्तीने त्यांना थेट धमकी दिली. त्याने 'तू निवडणुकीतून माघार घे, नाहीतर तुझा संतोष देशमुख करू,' असे धमकावले. धमकी देणाऱ्याचा एक साथीदार रेल्वे रुळांजवळ थांबला होता.
advertisement
संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल
दरम्यान, या गंभीर घटनेनंतर बनसोडे यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात धाव घेतली. याविषयी फुरसुंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांनी माहिती दिली की, बनसोडे यांच्या तक्रारीनुसार संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदारांनी दिलेल्या वर्णनानुसार, धमकी देणाऱ्याचे स्केच तयार करण्याचे काम सुरू असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास वेगाने सुरू आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 03, 2025 11:45 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Election : '...नाहीतर तुझा संतोष देशमुख करू', फुरसुंगी नगरपरिषदेच्या उमेदवारास गाडी अडवून धमकी! नेमकं काय घडलं? पाहा


