2026 Horoscope: दिनांक 2, 11, 20, 29 या तारखांचा जन्म आहे? नवीन वर्ष 2026 तुम्हाला काय देणार, काय गमावणार

Last Updated:
Mulank 2 2026 Horoscope: आता बघता-बघता नवीन वर्ष 2026 सुरू होईल. नवीन वर्ष त्यांच्या करिअर, मालमत्ता, गुंतवणूक, आरोग्य, शिक्षण आणि इतर गोष्टींसाठी कसे असेल? याचा सर्वांना अंदाज देण्याचं काम अंकशास्त्र करतं. आपल्या जन्मतारखेच्या आधारे आपण वार्षिक अंदाज घेऊ शकतो. कोणत्याही महिन्याच्या दिनांक 2, 11, 20 किंवा 29 तारखेला जन्म झालेल्यांसाठी नवीन वर्ष कसे असेल, म्हणजेच मूलांक 2 विषयी आपण जाणून घेऊ.
1/6
करिअरमध्ये प्रगती आणि आर्थिक लाभ - मूलांक 2 असलेल्यांना नवीन वर्षात करिअरमध्ये यश मिळेल. कोणताही मोठा प्रकल्प प्रलंबित असेल तर तो नवीन वर्षात पूर्ण होऊ शकतो. कामातील अडचणी दूर होतील. नोकरी शोधणाऱ्यांना नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे, मनासारखी बदली देखील शक्य आहे. सोने-चांदी, बँकिंग क्षेत्र, लेखन, सर्जनशील क्षेत्र इत्यादींमध्ये असलेल्यांना नवीन वर्ष उत्तम जाईल. त्यांना चांगला आर्थिक नफा मिळू शकेल. शेअर बाजार आणि मालमत्तेत गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल, परंतु सर्व गोष्टींची नीट माहिती घेऊन निर्णय घ्या.

advertisement
2/6
अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी - शैक्षणिक स्पर्धांमध्ये आपणास अनपेक्षित परिणाम मिळू शकतात. नवीन वर्षात तुम्ही अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी करू शकाल. नवीन वर्ष तुमच्या शिक्षण आणि परीक्षेशी संबंधित बाबींसाठी अनुकूल आहे. कमी प्रयत्नात तुम्ही चांगले निकाल मिळवू शकता, परंतु यासाठी अविरत कष्ट हवे आहेत. नवीन वर्षात तुमचे काही नवीन मित्र बनतील, ते भविष्यात तुमच्यासाठी उपयुक्त ठरतील.

3/6
आरोग्य चांगले राहील - नवीन वर्ष मूलांक 2 असलेल्यांच्या आरोग्यासाठी खूप चांगले असेल. 2025 मध्ये विविध आरोग्य समस्या आल्या असतील किंवा शस्त्रक्रिया झाली असेल, तर तुम्हाला नवीन वर्षात काळजी करण्याची गरज नाही. नवीन वर्षात तुम्ही निरोगी राहाल, दवाखान्याचे हेलपाटे कमी होतील. नवीन वर्षात कोणत्याही मोठ्या आरोग्य समस्या उद्भवण्याची शक्यता कमी आहे.

4/6
नवीन वर्षात मूलांक 2 असलेल्यांचे प्रेम आणि वैवाहिक जीवन चांगले राहील, परंतु तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. तुमच्या जोडीदाराला आरोग्याशी संबंधित समस्या येऊ शकतात.

5/6
नवीन वर्षात मूलांक 2 असलेल्यांनी लक्षात ठेवण्याच्या गोष्टी - नवीन वर्षात आपल्या गुरूंचा अनादर करू नका. तुम्हाला शिकवणारी प्रत्येक व्यक्ती गुरु आहे. त्यांचा आदर करा, याचा तुम्हालाच फायदा होईल.कायदेशीर कागदपत्रे किंवा करारांवर स्वाक्षरी करताना पूर्णपणे वाचल्याशिवाय आणि समजून घेतल्याशिवाय सही करू नका, अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता. कोणीतरी तुम्हाला फसवू शकते, खबरदारी घ्यायला लागेल.

6/6
मूलांक 2 असलेल्यांना सल्ला - भूतकाळ विसरून तुम्ही भविष्यावर लक्ष केंद्रित करा. या मूलांकाचे लोक जास्त विचार करणारे असतात, कल्पनारम्य जगात राहतात. अशा व्यक्तींना गेल्या वर्षी काय घडले ते विसरून नवीन आशेने नवीन वर्षाचे स्वागत करण्याचा सल्ला दिला जातोय. (सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मूलांक 2 असलेल्यांना सल्ला - भूतकाळ विसरून तुम्ही भविष्यावर लक्ष केंद्रित करा. या मूलांकाचे लोक जास्त विचार करणारे असतात, कल्पनारम्य जगात राहतात. अशा व्यक्तींना गेल्या वर्षी काय घडले ते विसरून नवीन आशेने नवीन वर्षाचे स्वागत करण्याचा सल्ला दिला जातोय.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
advertisement
Maharashtra Local Body Election: जिल्हा परिषद निवडणुका लांबणार? मग महापालिका निवडणूक कधी? निवडणूक आयोगाकडून मोठी अपडेट समोर
ZP निवडणुका लांबणार? मग महापालिका निवडणूक कधी? ECकडून मोठी अपडेट
  • ZP निवडणुका लांबणार? मग महापालिका निवडणूक कधी? ECकडून मोठी अपडेट

View All
advertisement