संसाराच्या व्यापातूनही शोधली संधी! मावळच्या सखुबाई लंकेंचा आवाज एकदा ऐकाच, पुन्हा पुन्हा पाहाल VIDEO
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
घरातील चूल आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळणाऱ्या एका गृहिणीने आपल्या जादुई आवाजाने लाखो लोकांचं मन जिंकलं आहे.
पुणे : घरातील चूल आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळणाऱ्या एका गृहिणीने आपल्या जादुई आवाजाने लाखो लोकांचं मन जिंकलं आहे. ही महिला सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील घोणशेत गावात राहणाऱ्या 48 वर्षीय सखुबाई लंके यांची कहाणी अशा अनेक स्त्रियांना प्रेरणा देणारी आहे, ज्यांना परिस्थितीमुळे त्यांच्या कलागुणांना वाव देता आला नाही.
वयाच्या सोळाव्या वर्षी लग्न झाल्यावर सखुबाई यांनी संपूर्ण आयुष्य कुटुंबाला समर्पित केलं. मात्र, आता त्यांनी सिद्ध केलं आहे, की कलेला कोणतीही ‘एक्सपायरी डेट’ नसते. कोणत्याही प्रकारचे ग्लॅमरस शूटिंग किंवा एडिटिंगचा आधार न घेता, सखुबाई अगदी साध्या घरात, सहजपणे गाणी गाऊन व्हिडिओ रेकॉर्ड करतात. त्यांचा हाच साधेपणा आणि प्रामाणिकता लाखो लोकांना भुरळ घालत आहे.
advertisement
advertisement
सखुबाई यांनी गायलेल्या 'पन्ना की तमन्ना' या गाण्याच्या व्हिडिओला आतापर्यंत तब्बल ३.२ दशलक्ष (सुमारे ३२ लाख) व्ह्यूज मिळाले आहेत. तसंच, इन्स्टाग्रामवर त्यांची फॉलोअर्सची संख्या २७ हजारांहून अधिक झाली आहे. लता मंगेशकर यांच्यासह अनेक गायकांची जुनी हिंदी गीते त्या जेव्हा आत्मविश्वासाने आणि मनापासून गातात, तेव्हा त्यांच्या सुरातून त्यांच्यातील ही जिद्द आणि प्रतिभा स्पष्टपणे दिसून येते. सखुबाई लंके यांची ही कहाणी ही फक्त एका गोड आवाजाची नाही, तर प्रत्येक गृहिणीच्या स्वप्नांना मिळालेल्या संधीची आणि जिद्दीची आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 03, 2025 8:50 AM IST
मराठी बातम्या/Viral/
संसाराच्या व्यापातूनही शोधली संधी! मावळच्या सखुबाई लंकेंचा आवाज एकदा ऐकाच, पुन्हा पुन्हा पाहाल VIDEO


