प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, लोणावळा यार्ड विस्तारामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम, या गाड्या उशिराने धावणार
- Published by:Mohan Najan
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
या कामांसाठी प्री नॉन-इंटरलॉकिंग आणि नॉन-इंटरलॉकिंग अशा दोन टप्प्यांतील महत्त्वाचे काम होणार असून त्यासाठी विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे.
मुंबई: मध्य रेल्वेने जाहीर केलेल्या माहितीनुसार लोणावळा–बीव्हीटी यार्डमध्ये अप आणि डाउन मार्गांसह इतर अतिरिक्त मार्गांच्या विस्ताराचे काम हाती घेण्यात येत आहे. या कामांसाठी प्री नॉन-इंटरलॉकिंग आणि नॉन-इंटरलॉकिंग अशा दोन टप्प्यांतील महत्त्वाचे काम होणार असून त्यासाठी विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे.
8 डिसेंबर: चार तासांचा विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक
8 डिसेंबर रोजी सकाळी 11.25 ते दुपारी 3.25 या वेळेत लोणावळा–बीव्हीटी यार्डमध्ये प्री नॉन-इंटरलॉकिंग कामासाठी चार तासांचा ब्लॉक घेण्यात येईल. या ब्लॉकदरम्यान दीर्घ पल्ल्याच्या काही गाड्यांमध्ये तात्पुरते बदल केले जात आहेत.
advertisement
1) सीएसएमटी–चेन्नई एक्स्प्रेसला लोणावळा स्थानकावर अतिरिक्त 5 मिनिटांचा थांबा देण्यात येणार आहे.
2) ब्लॉकच्या कालावधीत पुणे उपनगरीय रेल्वे सेवेवर थेट परिणाम होणार असून काही लोकल गाड्यांचे वेळापत्रक बदलले जाईल किंवा काही सेवा उशिराने धावतील.
3) मध्य रेल्वेकडून प्रवाशांना प्रवासापूर्वी वेळापत्रकाची अद्ययावत माहिती तपासण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
10 डिसेंबर: चार तासांचा नॉन-इंटरलॉकिंग ब्लॉक
1) 10 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजेपासून ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत नॉन-इंटरलॉकिंग कामासाठी आणखी एक महत्त्वाचा ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. या ब्लॉकमुळे पुणे विभागातील अनेक गाड्यांवर थेट परिणाम होणार आहे.
advertisement
2) ब्लॉकदरम्यान पुढील गाड्यांना 10 ते 30 मिनिटांचे तात्पुरते थांबे देण्यात येतील.
नागरकोईल–सीएसएमटी एक्स्प्रेस
पुणे–सीएसएमटी डेक्कन एक्स्प्रेस
दौंड–इंदौर एक्स्प्रेस
3) याशिवाय, पुणे उपनगरीय लोकल सेवेचे वेळापत्रक बदलले जाणार असून काही लोकल सेवा निर्धारित वेळेपेक्षा उशिराने धावतील किंवा मार्गात बदल केले जाऊ शकतात. लोणावळा–बीव्हीटी यार्डमध्ये सुरू असलेले मार्ग विस्ताराचे काम पूर्ण झाल्यानंतर गाड्यांची वाहतूक क्षमता वाढण्यास मदत होणार असून भविष्यातील रेल्वे चालना अधिक सुरळीत होणार आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 08, 2025 8:45 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, लोणावळा यार्ड विस्तारामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम, या गाड्या उशिराने धावणार


