Ankita Walawalkar : प्रणित मोरेची BB19 ट्रॉफी हुकली, कोकण हार्टेड गर्ल दुखावली; म्हणाली, 'वोट्स फक्त...'
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Ankita Walawalkar Post for Pranit More : स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेच्या हातून बिग बॉस 19ची ट्रॉफी हुकली. प्रणित मोरेसाठी बिग बॉस मराठी 5 ची स्पर्धक अंकिता वालावलकर हिने खास पोस्ट लिहिली आहे.
advertisement
advertisement
advertisement
'बिग बॉस 19' च्या टॉप 3 मध्ये गौरव खन्ना, फरहाना भट्ट आणि मराठमोळा स्पर्धक प्रणित मोरे यांनी स्थान मिळवलं होतं. मात्र, अंतिम फेरीच्या आधीच प्रणित तिसऱ्या क्रमांकावर एलिमिनेट झाला. प्रणित बाहेर पडताच त्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली. अंकिता वालावलकरने प्रणितच्या एलिमिनेशनवर आपली प्रतिक्रिया दिली.
advertisement
अंकिताने इन्स्टाग्राम स्टोरीवर प्रणितचा फोटो शेअर करत लिहिलं, "छान खेळलास… ना शिवीगाळ, ना अनावश्यक ड्रामा… संपूर्ण प्रवासात तू प्रतिष्ठेनं खेळलास. मतं ही फक्त एक कारण असतात… आमच्यासाठी तर तू आधीच विजेता आहेस." प्रणितच्या हातून ट्रॉफी गेल्याचं अंकितालाही दु:ख झाल्याचं या पोस्टमध्ये पाहायला मिळालं.
advertisement
advertisement


