Kalyan News : खुनाचा प्रयत्न झाला नाही तरी 11 वर्ष खटला चालला, अखेर न्यायालयाने दिला असा निर्णय, सगळेच..
Last Updated:
Shahapur Case : अकरा वर्षांपासून सुरू असलेल्या शहापूर खून प्रयत्न प्रकरणात सबळ पुरावे न मिळाल्याने कल्याण जिल्हा न्यायालयाने आठही आरोपींची निर्दोष मुक्तता केली. साक्षीदारांनी जबाब बदलल्याने खटल्याला कलाटणी मिळाली आणि गुन्हा सिद्ध होऊ शकला नाही.
कल्याण : शहापूर तालुक्यातील शेणवे नाक्यावर झालेल्या खूनाच्या प्रयत्नाच्या खटल्याचा निकाल तब्बल 11 वर्षांनी लागला. या प्रकरणात आठ जणांवर खुनाचा प्रयत्न आणि मारहाणीचे गंभीर आरोप होते. मात्र न्यायालयाने सबळ पुरावे नसल्याने सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले.
11 वर्षांनंतर न्यायालयाचा मोठा निर्णय
हा खटला कल्याण जिल्हा आणि सत्र न्यायालयात अनेक वर्षे चालला होता. ज्यात सचिन जयराम सोगीर, मनीष वरकुटे, रमेश पडवळ, कल्पेश पडवळ, कल्पेश घेडगे, मयूर तारमळे, हरेश भोईर आणि कुंडलिक टेंभे अशी आरोपींची नावे होती. पिडीत व्यक्तीच्या तक्रारीनुसार किन्हवली पोलिसांनी या आठ जणांवर खूनाच्या प्रयत्नासह भारतीय दंड विधानातील कलम 147, 148, 149 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.
advertisement
साक्षीदारांचे जबाब बदलले आणि संपूर्ण केस उलटली
या खटल्यात सर्वात महत्त्वाची भूमिका कुलदीप पडवळ आणि त्याचा भाऊ संदीप या दोन साक्षीदारांची होती. मात्र न्यायालयात त्यांनी आपली पूर्वीची साक्षच बदलली. यात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी पोलिसांसमोर आणि न्यायालयात दिलेल्या जबाबांमध्ये मोठे फरक दिसून आले होते, त्यामुळे त्यांची साक्ष योग्य मानता येणार नाही
,असे न्यायालयाने स्पष्ट केले. ज्यात दोघांनीच हल्ला झाल्याचे नाकारल्याने संपूर्ण खटल्याला मोठी कलाटणी मिळाली.
advertisement
वैद्यकीय अहवालाचा तपासून पाहिला असता त्या जखमा आरोपींमुळेच झाल्या होत्या हा सिद्ध करणारा पुरावा न्यायालयात सादर करता आला नाही शिवाय या तपासात अनेक त्रुटी असल्याचेही न्यायालयाने निरीक्षणात नमूद केले. सर्वोच्च न्यायालयातील काही निर्णयांचा आधार घेत आणि पुराव्या अभावी आरोपींवर गुन्हा सिद्ध होत नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आणि आठही जणांची पूर्णपणे निर्दोष मुक्तता केली.
advertisement
तसेच मुख्य गुन्हाच सिद्ध झाला नसल्याने या प्रकरणातील फरार आरोपी किरण उखाडे, भिमा इटकर, सतीश जाधव आणि संतोष यादव यांच्यावर पुढील कोणतीही कायदेशीर कारवाई करता येणार नसल्याचेही न्यायालयाने नमूद केले.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 08, 2025 12:08 PM IST
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Kalyan News : खुनाचा प्रयत्न झाला नाही तरी 11 वर्ष खटला चालला, अखेर न्यायालयाने दिला असा निर्णय, सगळेच..


