नाइट क्लब आगीत २५ मृत्यूनंतर मालक रातोरात देश सोडून फरार

Last Updated:

उत्तर गोव्यातील अर्पोरा गावातील नाईट क्लबमध्ये भीषण आगीत २५ मृत्यू, मालक सौरभ लुथरा फरार, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी चौकशीचे आदेश दिले.

News18
News18
उत्तर गोव्यातील एका नाईट क्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीत २५ निष्पाप लोकांचा जीव गेल्यानंतर आता धक्कादायक माहिती समोर येत आहे. जिथे हा नाईट क्लब होता, त्या हॉटेलचा मालक घटनेनंतर फरार झाला आहे. या घटनेमुळे महाराष्ट्रासह देशभरात हळहळ व्यक्त होत असताना, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नाइट क्लबचा मालक भारताबाहेर पळून गेल्याची माहिती मिळाली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या हॉटेलचा मालक सौरभ लुथरा हा घटनेनंतर देशाबाहेर पळून गेला असावा, अशी दाट शक्यता आहे. या दुर्घटनेत २५ लोकांचा मृत्यू झाल्यामुळे त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
सुरक्षिततेच्या नियमांची पायमल्ली
या नाईट क्लबमध्ये सुरक्षा मानकांचे आणि अग्निसुरक्षेच्या नियमांचे मोठे उल्लंघन झाले होते. बेली डान्सरच्या परफॉर्मन्सदरम्यान वापरलेल्या 'इलेक्ट्रॉनिक फायर क्रॅकरमुळे आग लागली होती. या आगीत कर्मचारी आणि पर्यटकांसह 25 जणांचा होरपळून आणि गुदमरुन मृत्यू झाला.
advertisement
क्लबचं छत आणि भिंती बांबूच्या साहित्यापासून बनवल्यामुळे आग वेगाने पसरली आणि मोठी जीवितहानी झाली. या घटनेनंतर पोलिसांना तातडीनं पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांना ताब्यात घेतलं आहे त्यांची चौकशी सुरू आहे.
नाइट क्लबचा मालक सौरभ लुथरा अद्याप फरार आहे. 2013 मध्ये त्याने वशिला लावून नाइट क्लब आणि रेस्टॉरंटसाठी अवैध पद्धतीनं लायसन्स घेतलं होतं. हा क्लब बेकायदेशीरपणे बांधण्यात आला होता. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी नाईट क्लब आगीची दंडाधिकारी चौकशीचे आदेश दिले आहेत.
advertisement
पणजीपासून २५ किमी अंतरावर असलेल्या अर्पोरा गावात हा क्लब बेकायदेशीरपणे बांधण्यात आला होता. २०१३ मध्ये फसव्या मार्गाने या क्लबला परवाना मिळाला होता. आता या प्रकरणांची चौकशी केली जात आहे.
view comments
मराठी बातम्या/गोवा/
नाइट क्लब आगीत २५ मृत्यूनंतर मालक रातोरात देश सोडून फरार
Next Article
advertisement
Nanded Crime : बॉयफ्रेंडच्या मृतदेहाशी लग्न केलं, आंचलने सांगितलं थेट सांगितलं कारण, 'सक्षमसोबत...'
बॉयफ्रेंडच्या मृतदेहाशी लग्न केलं, आंचलने सांगितलं थेट सांगितलं कारण, 'सक्षमसोबत
  • बॉयफ्रेंडच्या मृतदेहाशी लग्न केलं, आंचलने सांगितलं थेट सांगितलं कारण, 'सक्षमसोबत

  • बॉयफ्रेंडच्या मृतदेहाशी लग्न केलं, आंचलने सांगितलं थेट सांगितलं कारण, 'सक्षमसोबत

  • बॉयफ्रेंडच्या मृतदेहाशी लग्न केलं, आंचलने सांगितलं थेट सांगितलं कारण, 'सक्षमसोबत

View All
advertisement