तुमच्या लॅपटॉपमध्येही आहे ‘Free’ Antivirus! व्हायरसपासून बचावासाठी असा करा वापर
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
तुमच्या लॅपटॉपला व्हायरस आणि हॅकर्सपासून वाचवण्यासाठी अँटीव्हायरस सॉफ्टवेअर आवश्यक आहे. तुम्ही विंडोज लॅपटॉप वापरत असाल, तर तुम्हाला कंपनीकडून एक फ्री सॉफ्टवेअर टूल मिळते जे तुमची सिस्टम सुरक्षित ठेवण्यास मदत करू शकते. खरंतर, ते संपूर्ण अँटीव्हायरस टूल समजू नका.
advertisement
1/5

तुमच्या Laptopला Virus आणि हॅकर्सपासून वाचवण्यासाठी अँटीव्हायरस आवश्यक आहे. काही लोक अँटीव्हायरस खरेदी करून त्यांच्या सिस्टम सुरक्षित करतात. तर काहीजण त्यावर पैसे खर्च करणे टाळतात. तुमच्या सिस्टममध्ये आधीच एक फ्री सुरक्षा टूल आहे हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. परंतु अनेकांना त्याबद्दल माहितीही नसते. हे टूल तुमच्या लॅपटॉपला दुर्भावनापूर्ण फाइल्स आणि व्हायरसपासून वाचवण्यासाठी काम करते.
advertisement
2/5
हे एक फ्री सिस्टम-संरक्षण करणारे टूल : विंडोज लॅपटॉपवर उपलब्ध असलेल्या या टूलला मॅलिशियस सॉफ्टवेअर रिमूव्हल टूल (MSRT) म्हणतात. हे टूल शोधण्यासाठी, Windows+R दाबा आणि mrt टाइप करा. तुम्हाला ते सापडेल. हे टूल तुमची सिस्टम स्कॅन करू शकते, व्हायरस शोधू शकते आणि काढून टाकू शकते.
advertisement
3/5
MSRT हे विंडोज सिस्टममध्ये आढळणारे एक बिल्ट-इन व्हायरस रिमूव्हल टूल आहे. हे टूल तुम्हाला व्हायरस आणि मालवेअर शोधण्याची आणि काढून टाकण्याची परमिशन देते. हे टूल क्विक, पूर्ण आणि कस्टमाइज्ड स्कॅन ऑप्शन्स देते.
advertisement
4/5
तसेच, हा ऑप्शन : तुम्हाला हे टूल सापडले नाही, तर तुमच्या लॅपटॉपच्या तळाशी असलेल्या सर्च बारचा वापर करून windows security शोधा. या टूलवर क्लिक केल्याने तुम्हाला डावीकडे व्हायरस आणि थ्रेट प्रोटेक्शन आणि फायरवॉल आणि नेटवर्क प्रोटेक्शन दिसेल.
advertisement
5/5
टीप: येथे एक गोष्ट लक्षात ठेवा की, MSRT हे एक उपयुक्त टूल असले तरी ते संपूर्ण अँटीव्हायरस प्रोग्रामचा पर्याय नाही. तुम्ही ते एक अतिरिक्त सुरक्षा स्तर मानू शकता. परंतु चांगल्या संरक्षणासाठी, सायबर धोक्यांपासून तुमची सिस्टम सुरक्षित ठेवण्यासाठी Microsoft Defenderच्या प्रगत फीचर्सचा वापर करा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/बातम्या/
तुमच्या लॅपटॉपमध्येही आहे ‘Free’ Antivirus! व्हायरसपासून बचावासाठी असा करा वापर