TRENDING:

बापाची संपत्ती हवी, पण बापाचा आधार नको? छळणाऱ्या पाषाणहृदयी मुलांचा बंदोबस्त करण्यासाठी 'हा' सरकारी नंबर लगेच सेव्ह करा!

पुणे

पुणे : गेल्या काही वर्षांपासून प्रॉपर्टीच्या वादावरून ज्येष्ठ नागरिकांना त्रास देण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. तसेच वयोमानानुसार उद्भवणाऱ्या शारीरिक अडचणी, एकटेपणा, नातेसंबंधांतील दुरावा, मुलांकडून होणारा तिरस्कार अशा प्रसंगांना अनेक ज्येष्ठ नागरिकांना सामोरं जावं लागतं. या सगळ्या अनुभवांमुळे त्यांच्या आयुष्यात एकाकीपणा आणि नैराश्य वाढू लागते. आपल्या अडचणी कोणाला सांगायच्या? हा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहतो. याच समस्या दूर करण्यासाठी भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या अंतर्गत एक हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत 10 कोटी वृद्ध नागरिकांनी यावरती तक्रार केली आहे. तर 2025 मध्ये महाराष्ट्रातील 4 लाखांहून अधिक ज्येष्ठ नागरिकांना लाभ मिळाला आहे.

Last Updated: December 08, 2025, 18:09 IST
Advertisement

फक्त ३० रुपयांत बटर चिकन पाव! मुंबईत 'या' ठिकाणी खवय्यांची तुफान गर्दी; चव चाखून बोटं चाखत राहाल!

Food

मुंबई: दादरमधील 'फूड्‍स माफिया' या फूड स्टॉलवर आपल्याला एक चविष्ट आणि घरगुती पद्धतीने तयार केलेले बटर चिकन पाव आणि विविध स्वादिष्ट फूड्‍सची चव चाखायला मिळते. मुंबईमध्ये पहिला बटर चिकन पाव यांनीच विकण्यास सुरुवात केली. या स्टॉलवर 30 रुपयांमध्ये बटर चिकन पाव मिळतो ज्यामध्ये ताजं चिकन आणि मऊ पाव तुम्हाला मिळतो. तसेच स्पेशल बटर चिकन पावमध्ये सॉस, चाट, चिकन स्टिक, आणि ताजं सलाड यांचा समावेश असतो आणि याची किंमत 50 रूपये इतकी आहे.

Last Updated: December 08, 2025, 17:39 IST

100 किमी शुन्य खर्चात चालवा, नंतर पेट्रोलवर पळवा, सोलापूरचा पठ्या बनवून देतो हायब्रिड BIKE

सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील लोणारवाडी गावात राहणाऱ्या दोन मित्रांनी पेट्रोलवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाला चार्जिंगवर चालणारे वाहन बनवले आहे. संकेत जाधव आणि समाधान शेवाळे दोघे राहणार लोणारवाडी, असे पेट्रोल आणि चार्जिंगवर चालणारी दुचाकी वाहन बनवणाऱ्या तरुणाचे नाव आहेत. या संदर्भात अधिक माहिती संकेत जाधव यांनी लोकल 18 शी बोलताना दिली आहे.

Last Updated: December 08, 2025, 17:14 IST
Advertisement

मटण खारीबोटी खाल्लीये का? सोलापूरच्या खाद्यसंस्कृतीची 'ही' आहे खरी ओळख; जाणून घ्या रेसिपी!

भिन्न संस्कृतीचं शहर असलेल्या सोलापूरमधील खाद्य संस्कृतीमध्येही विविधता आहे. सोलापूरमधील अनेक पदार्थ राज्यात फेमस आहेत. मटण खारीबोटी हासोलापुरी पदार्थही नॉनव्हेजप्रेमींमध्ये चांगलाच फेमस आहे. ही डिश कशी बनते ते पाहूया

Last Updated: December 08, 2025, 16:25 IST

श्वानतज्ज्ञांचा खास सल्ला! घरगुती पद्धतीने श्वानांना कशी द्यावी आंघोळ? Video

आपल्या श्वानांना स्वच्छ ठेवावे ही प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी बाजारामध्ये महागडे शाम्पू आणि साबण हे उपलब्ध आहेत. हे प्रॉडक्ट बाजारामध्ये महाग भेटतात आणि ते प्रत्येकाला घेणे परवडत नाहीत. यासाठी छत्रपती संभाजीनगरमधील श्वानतज्ञ डॉक्टर डॉ.अनिल दाभेकर उपाय सांगितले आहेत.

Last Updated: December 08, 2025, 14:53 IST
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/पुणे/
बापाची संपत्ती हवी, पण बापाचा आधार नको? छळणाऱ्या पाषाणहृदयी मुलांचा बंदोबस्त करण्यासाठी 'हा' सरकारी नंबर लगेच सेव्ह करा!
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल